बेरोजगारांनो, तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग; ‘या’ क्षेत्रात संधी

New Job Opportunities 2021

New Job Opportunities 2021: During the COVID period, a large number of vaccine companies were recruited. The company expects demand to continue in the sector in the near future. In the health sector, the growth of recruitment in pharmaceutical companies is expected to continue; satisfactory recruitment in the health and industrial sectors is expected.

बेरोजगारांनो, तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग; ‘या’ क्षेत्रात संधी

 मुंबई : काेराेना महामारीमुळे अनेकांच्या राेजगारावर संकट आले. नव्या नाेकरीच्या संधीही कमी हाेत्या. मात्र, नव्या वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक कंपन्या २०२१ या वर्षामध्ये कर्मचारी संख्या वाढविण्याच्या विचारात आहेत.

रोजगाराची सुवर्णसंधी; नव्या वर्षात ही कंपनी 9 हजार लोकांना नोकरी देणार

 व्यावसायिक भरती सेवा उपलब्ध करणारी कंपनी मायकल पेज इंडियाच्या ‘टॅलेंट ट्रेंड्स २०२१’ या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समाेर आली आहे. सुमारे ५३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविण्याच्या तयारीत आहेत. काेराेनामुळे संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, राेजगाराचे माेठे संकट निर्माण झाले. नाेकरभरतीमध्ये १८ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मात्र, नव्या वर्षात दिलासादायक चित्र अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हळूहळू सुधारणा हाेत आहे. त्यामुळे नाेकरभरतीला लवकरच सुरुवात हाेण्याची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

नव्या वर्षात रोजगाराची सुवर्णसंधी, 1100 इंजिनियर्सना मिळणार नोकरी

 काेराेना काळात लस उत्पादक कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती केली. येणाऱ्या काळातही या क्षेत्रात मागणी राहणार असल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. आराेग्य क्षेत्रातीलतपासणी, औषध निर्मिती कंपन्यांमध्ये नाेकरभरतीतील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे ;आराेग्य आणि औद्याेगिक क्षेत्रात समाधानकारक नाेकरभरतीची अपेक्षा आहे. याशिवाय इंटरनेटवर आधारित व्यवसायांमध्येही मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. ई-काॅमर्स, तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिलासादायक चित्र राहण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण सर्वेक्षणात नाेंदविले आहे.

नव्या नाेकरीच्या संधींसाेबत वेतनामध्येही १५ ते २० टक्के वाढीची अपेक्षा आहे. त्यातही आराेग्य क्षेत्रामध्ये ही शक्यता जास्त असून, या क्षेत्रातील कंपन्या जवळपास महिनाभराचा पगार बाेनस स्वरूपात देण्याच्या तयारीत असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील ७४ टक्के कंपन्या मनुष्यबळ वृद्धीच्या तयारीत आहेत. यात सुमारे १४ टक्के वाढ दिसू शकते. विशेष म्हणजे, ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेतून काम करण्यासाठी तयार असलेल्यांना जास्त संधी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!