NHM Bharti 2019 Results Declared
NHM Bharti 2019 Results Declared
राष्ट्रीय आरोग्य अभियान परीक्षेचा निकाल
NHM Mega Recruitment 2019 : Candidates who have passed the August Examination for the post of Community Health Officer under the National Health Mission have been advised by the campaign committee to contact the district hospital on November 7th.
NHM CHO Result
NHM CHO Bharti 2019 Result
The recruitment process has been going on since July, for the purpose of filling up 5 thousand 716 posts of contractual posts under National Health Mission in the state. Under the recruitment, candidates who have passed the examination in August will be consulted at the district level. For this, the candidates who want to attend the hospital of the district selected in the application registration. Detailed information regarding the counseling process has been released by the mission website at www.nrhm.maharashtra.gov.in. It is urged to contact the District Hospital Officer in this regard as it is mandatory for all the passing candidates to complete the counseling.
समुदाय आरोग्य अधिकारी परीक्षा उत्तीर्णांना सूचना
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता घेण्यात आलेल्या ऑगस्ट परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी सोमवारी (११ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयात संपर्क साधण्याची सूचना अभियान समितीततर्फे करण्यात आली आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५ हजार ७१६ जागा भरण्यात येत असून, त्यासाठी जुलै महिन्यापासून भरतीप्रक्रिया सुरू आहे. भरती अंतर्गत ऑगस्ट महिन्यात झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे जिल्हा पातळीवर समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज नोंदणीत निवड केलेल्या जिल्ह्याच्या रुग्णालयात उपस्थित राहायचे आहे. समुपदेशन प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती अभियानातर्फे www.nrhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. सर्व उत्तीर्ण उमेदवारांना समुपदेशन पूर्ण करणे अनिवार्य असल्याने त्या संदर्भात जिल्हा रुग्णालय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
म. टा.