खूशखबर! नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी विविध पदांकरिता भरती होणार !

NMC COVID-19 Bharti 2020

खूशखबर! नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी विविध पदांकरिता भरती होणार !

Nagpur Municipal Corporation Recruitment 2020: Five dedicated healthcare centers have been started by the municipality on the backdrop of Corona. But it was not operating due to a lack of doctors and manpower. Municipal Commissioner Radhakrishnan B. He has started the manpower arrangement of the concerned healthcare center. He has sent the proposal to appoint expert doctors, nurses, technicians, ward boys, etc. on a contract basis to the Standing Committee for approval. It has been decided to do it on a contract basis, honorarium basis on a contract basis. It is proposed to sanction Rs 97.98 lakh for three months.

Nagpur Municipal Corporation Recruitment 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. कंत्राटी पद्धत, करार आधारावर मानधन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यासाठी ९७.९८ लाख रुपये मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत अहे.

प्रस्तावांतर्गत फिजिशियन व इन्टेंसिव्ह केअर तज्ज्ञांना ७५ हजार रुपये फिक्स मानधन व इन्सेंटिव्ह १.२५ लाख रुपयापर्यंत दिले जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या ११ पदांना मंजुरी देण्यात येईल. यात फिजिश्यिन, इन्सेंटिव्ह केअर, अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ आदींचा समावेश राहील. त्याचप्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीयूमध्ये पीपीई किट घालून राहावे लागेल.

NHM Nagpur Bharti 2020 

अशा परिस्थितीत एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीयूएमएस डॉक्टरांना १० हजार रुपये, स्टाफ नर्सला ७ हजार रुपये व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत वॉर्ड बॉयला ३ हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. दर महिन्याला वेतनावर ३२.६६ लाख रुपये खर्च होईल. आरोग्य विभागाच्या आस्थापना खर्चातून संबंधित निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

पद संख्या – Nagpur Municipal Corporation Recruitment 2020

  • स्पेशलिस्ट डॉक्टर ११
  • मेडिकल ऑफिसर ३७
  • हॉस्पिटल मॅनेजर ०५
  • स्टाफ नर्स ११५
  • एक्स रे टेक्निशियन ०५
  • इसीजी टेक्निशयन ०५
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर १०
  • वॉर्ड बॉय ३०

सोर्स : लोकमत

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!