बदलतेय एसएससी-रेल्वे-बँक भरतीची पद्धत, सप्टेंबरपासून अशा होतील परीक्षा

NRA Common online Test

NRA Common Online Test: There will no longer be a need to fill out different forms or take multiple exams for government jobs. The Central Government had approved the One Nation-One Exam. The National Recruitment Agency (NRA) will conduct a single examination instead of different examinations for different departments. In this you can apply on the basis of marks. The National Recruitment Agency (NRA) will start conducting online examinations for government jobs of SSC-IBPS-RRB from September.

बदलतेय एसएससी-रेल्वे-बँक भरतीची पद्धत, सप्टेंबरपासून अशा होतील परीक्षा

 नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) सप्टेंबरपासून एसएससी-आयबीपीएस-आरआरबीच्या सरकारी नोकरीसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यास सुरूवात करेल. कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही घोषणा केली. एनआरए कशाप्रकारे काम करेल, निवड कशी होईल ते जाणून घेवूयात…

 आता सरकारी नोकरीसाठी वेगवेगळे फॉर्म भरणे किंवा अनेक परीक्षा देण्याची आवश्यकता असणार नाही. केंद्र सरकारने वन नेशन-वन एग्झामला मंजूरी दिली होती. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या परीक्षांऐवजी एकच परीक्षा घेईल. यामध्ये गुणांच्या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता.

 केंद्र सरकारने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) मध्ये आरआरबी, आयबीपीएस आणि एसएससी विलिन केले होते. या सर्वामध्ये नोकरी मिळवण्यासाठी पूर्वी वेगवेगळ्या परीक्षा द%5याव्या लागत होत्या. परंतु याच वर्षी सप्टेंबरपासून या सर्व विभागांमध्ये नोकरीसाठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्टची व्यवस्था सुरू झाली आहे.

 केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सध्या सप्टेंबरपासून स्टाफ सेलेक्शन कमीशन (एसएससी), रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सीलेक्शन (आयबीपीएस) द्वारे विना तांत्रिक पदांसाठी घेण्यात येणार्‍या सर्व परीक्षा आता एनआरए घेईल. मात्र, भविष्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत भरतीसाठी परीक्षा एनआरएकडून घेतल्या जातील.

 सप्टेंबरपासून कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी) केवळ टीयर-1 म्हणजे स्क्रीनिंग किंवा शॉर्टलिस्ट पर्यंत परीक्षा घेईल. या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी व्हॅकन्सीसाठी होणार्‍या उच्च स्तरीय परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. सीईटी परीक्षा वर्षात दोन वेळा 12 भाषांमध्ये होईल. किमान वय 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा सध्याच्या नियमांच्या अंतर्गत असेल. एससी, एसटी, ओबीसी आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

 तर काही एजन्सीजने केवळ सीईटी परीक्षेच्या आधारावर थेट नोकरी देण्याचे सुद्धा संकेत दिले आहेत. भविष्यात हे शक्य होऊ शकते की, सीईटीचा स्कोअर राज्य आणि केंद्रासह खासगी क्षेत्राशी सुद्धा सामायिक केला जाईल. या टेस्टनंतर पुढील स्तराची उच्च परीक्षा होईल, ज्यामध्ये मेडिकल टेस्ट, इंटरव्ह्यू, फिजिकल टेस्टचा सुद्धा समावेश असेल

 वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेसाठी वेगळी सीईटी परीक्षा आयोजित होईल. आता एकाच अभ्यासक्रमावर तीन लेव्हल महणजे 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएट स्तरावर परीक्षा आयोजित होतील. परीक्षेचा अभ्यासक्रम 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन स्तराच्या आधारावर होईल.

 यानंतर सीईटीचा स्कोअर निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून तीन वर्षापर्यंत मान्य राहील. उदाहरणार्थ जर कुणाला आपला स्कोअर वाढवायचा असेल तर सतत ही परीक्षा देऊन पुढील लेव्हलवर जाऊ शकतो. सरकारचे म्हणणे आहे की, ही परीक्षा भरती प्रकिया आणखी सोपी करण्यासाठी बनवली आहे.


NRA to Conduct Common Eligibility Test

The central government has taken an important decision for the youth of the country. In today’s cabinet meeting, the central government has approved the National Recruitment Agency (NRA), said Minister Prakash Javadekar. So before, young people had to take a lot of exams for the job, now they have to take only one exam.

National Recruitment Agency

आता नोकरीसाठी केवल एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

देशातील तरुणांसाठीकेंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)ला मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी तरुणांना नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा घ्याव्या लागतात आता केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

करोना संकटानंतर देशात अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ला (NRA) हिरवा कंदील देण्यात आलाय.

केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ (NRA) ला हिरवा कंदील देण्यात आलाय. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिलीय.

नोकरी मिळवण्यासाठी सध्या तरुणांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात. यासाठी २० एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत अशा वेळी प्रत्येक एजन्सीसाठी वेगळी परीक्षा देण्यासाठी इच्छूक तरुणांना अनेक ठिकाणी जावं लागतं. परंतु, आता मात्र नॅशनल रिक्रूटमेन्ट एजन्सीद्वारे (राष्ट्रीय भरती परीक्षा) कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सामान्य पात्रता परीक्षा) घेण्यात येईल. याचा फायदा नोकरीच्या शोधात असलेल्या करोडो तरुणांना होईल, असंही जावडेकर यांनी म्हटलंय.

गेल्या कित्येक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी केली जात होती. परंतु, हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. आता मात्र नॅशन रिक्रूटमेन्ट एजन्सी गठीत करण्यात आल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकेल तसेच त्यांचे पैसेही वाचतील, असं म्हणत त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केलंय.

‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ 

– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे कॉमन एन्टरन्स टेस्ट, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड आणि आयबीपीएस द्वारे आयोजित टीयर १ परीक्षा एकाच वेळी घेता येतील. केंद्र सरकारमध्ये (NRA3 & 4) Gf-B आणि C पदांसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल

– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ मुळे निवड प्रक्रियेचा कालावधीही कमी होऊ शकेल.

– ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे १००० हून अधिक केंद्रांवर सीईटी आयोजित केली जाऊ शकेल.

– प्रत्येक वर्षात दोन वेळा सीईटी आयोजित केली जाईल

– सीईटी मध्ये ‘मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह’ प्रश्न असतील अर्थात दिलेल्या अनेक पर्यायांमधून एका उत्तराची निवड परीक्षार्थीला करावी लागेल.

– या सीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीचा उपयोग राज्य सरकारलाही करता येईल.

– हे बदल भरती, निवड आणि नोकरी प्रक्रियेत सहजता आणि समाजातील काही वर्गांसाठी मोठे फायदेशीर ठरतील

– सीईटीची मेरिट लिस्ट तीन वर्षांपर्यंत मान्य राहील. या दरम्यान उमेदवारी आपली योग्यता आणि आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सहज अर्ज करू शकतील

सरकारी भरती परीक्षा कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया आणि शुल्क वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा काही उणिवा राहून जातात. ग्रामीण महिला आणि दिव्यांगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’मुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतील, असा विश्वासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!