महत्त्वाची बातमी! ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा वेळेतच होणार;

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं स्पष्ट केलं आहे.

जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

नोटीशीत काय म्हटलं आहे –
“नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची होणारी मागणी अधिकारात नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आहे. आमच्या मते करोना संकटात आयुष्य थांबता कामा नये. उमेदवारांचं भवितव्य अंधारात टाकू शकत नाही, शिवाय त्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाता कामा नये. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा पार पडणार असून ती पुढे ढकलली जाणार नाही. पुनर्विचार याचिका योग्य नाही”.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली असून वेळेतच होईल असा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवू शकत नाही असं म्हटलं होतं.


NTA Exam Dates 2020

यूजीसी नेट, इग्नू ओपनमॅटसह सहा महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या सहा महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत…

NTA UGC NET, IGNOU OPENMAT & PhD, DU Entrance Test & Various Exams dates: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहा महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. यात दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET 2020), यूजीसी नेट जून २०२० (UGC NET June 2020), इग्नू ओपनमॅट आणि पीएचडी (IGNOU Openmat 2020 आणि IGNOU PhD 2020) सह अन्य परीक्षांचा समावेश आहे.

एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर नव्या तारखांबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात प्रत्येक परीक्षेचे शेड्युल, त्याची वेबसाइट आणि ऑफिशिअल ईमेल आयडीची माहिती देण्यात आली आहे.

या वृत्तात तुम्हाला एनटीएद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाची लिंकही देण्यात येत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करु शकता.

NEET 2020: परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर…

NTA Exams 2020: कधी होणार कोणती परीक्षा?

दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET 2020) – ६ ते ११ सप्टेंबर २०२०
आयसीएआर एआयईईईए (ICAR AIEEA 2020 UG) – ७ आणि ८ सप्टेंबर २०२०
इग्नू ओपनमॅट एमबीए एन्ट्रन्स एग्जाम (IGNOU OPENMAT 2020) – १५ सप्टेंबर २०२०
यूजीसी नेट जून 2020 (UGC NET 2020 June) – १६ ते १८ सप्टेंबर २०२० आणि २१ ते २५ सप्टेंबर २०२०
आयुष पीजी एंट्रन्स टेस्ट (AIAPGET 2020) – २८ सप्टेंबर २०२०
इग्नू पीएचडी एंन्ट्रन्स एक्झाम (IGNOU PhD 2020) – ४ ऑक्टोबर २०२०

हेल्पलाइन क्रमांक

एनटीएच्या या परीक्षांसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. यासाठी तुम्हाला परिपत्रकात दिलेल्या परीक्षांसंबंधी ईमेल आयडीवर मेल पाठवून माहिती मिळवता येईल. तुम्ही पुढे दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून देखील माहिती मिळवू शकता –

८२८७४७१८५२
८१७८३५९८४५
९६५०१७३६६८
९५९९६७६९५३
८८८२३५६८०३

NTA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

NTA exam schedule notice वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!