NTA ICAR AIEEA 2021: NTA तर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
NTA ICAR AIEEA 2021
The National Testing Agency (NTA) has started applications for AIARE (UG), AIEEA (PG) and AICE-JRF / SRF (PhD) examinations of the Indian Council of Agricultural Research (ICAR). Students who want to apply for this exam can apply by visiting the official website nta.ac.in and icar.nta.ac.in. August 20 is the last date to fill the application.
NTA तर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) च्या ऑल इंडिया प्रवेश परीक्षा AIEEA (यूजी), AIEEA (पीजी) आणि एआयसीई-जेआरएफ/एसआरएफ (पीएचडी) साठी अर्ज सुरु केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि icar.nta.ac.in जाऊन अर्ज करु शकतात. २० ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
या परीक्षेची तारीख (NTA ICAR AIEEA 2021 Exam Schedule) जाहीर झाली आहे. एआयईईए (यूजी)साठी प्रवेश परीक्षा ७,८ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. एआयईईए (पीजी) आणि एआयसीई-जेआरएफ/एसआरएफ (पीएचडी) साठी परीक्षा १७ सप्टेंबरला होणार आहे
असा करा अर्ज
- या परीक्षांसाठी अर्ज करताना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जा.
- होमपेजवर असणाऱ्या Application Form लिंकवर क्लिक करा
- इथे New Registration लिंकवर क्लिक करा
- आता मागितलेली माहिती भरुन नोंदणी करा
- फॉर्म भरण्यासाठी फोटो आणि सही अपलोड करा
- शेवटी फीस जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करा
परीक्षेचा तपशिल
ही परीक्षा कॉम्प्युटर आधारीत माध्यमातून (Computer Based Test, CBT) आयोजित केली जाणार आहे. यूजी लेवलसाठी ही अडीच तासांची परीक्षा असेल. पीजी आणि जेआरएफ/ एसआरएफसाठी दोन तासांची परीक्षा असेल. यूजी स्तर (Under Graduate)च्या परीक्षेत एकूण १५० प्रश्न विचारले जातील. पीजी स्तर (Post Graduation Level) परीक्षेमध्ये १६० प्रश्न विचारले जातील, तर जेआरएफ/एसआरएफ परीक्षेमध्ये २०० प्रश्न विचारले जातील.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा