दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा कार्यक्रम
Online Education Series Dnyanganga For 10th 12th Class Students
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा कार्यक्रम लवकरच’
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा’ शैक्षणिक कार्यक्रम लवकरच…
शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांत इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उशिराने सुरू होणार आहे.
शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत आले असताना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध नाही. येत्या काही दिवसांनी हे कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे या शैक्षणिक कार्यक्रमांचा किती विद्यार्थ्यांना फायदा होणार, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.
- बारावी वाणिज्य – सकाळी साडेसात ते साडेआठ
- बारावी विज्ञान – नऊ ते दहा
- बारावी व्यावसायिक शिक्षण – दहा ते साडेदहा
- बारावी कला – साडेदहा ते अकरा
- दहावी इंग्रजी माध्यम – साडेअकरा ते दुपारी साडेबारा