Opportunity for Reexam- वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी

Opportunity for re-examination of students who missed the exam due to storm

वादळामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी

Maharashtra has been hit by a Cyclone Tauktae for the last two days. Many universities in the state are conducting undergraduate or postgraduate final year examinations. The state government has decided to provide relief to the students who could not appear for the exams due to the storm (Cyclone Tauktae). Those who could not take the exam due to lack of internet connectivity will be given the opportunity to retake the subject. Concerned students should contact your college. The concerned college will announce the schedule of the remaining examinations of the students. This is a Tweeted by Union Minister for Higher and Technical Education Uday Samant.

महाराष्ट्राला गेले दोन दिवस तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये पदवीच्या किंवा पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वादळामुळे परीक्षा देता आलेली नाही, त्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इंटरनेट डिस्कनेक्टिव्हिटी, विजेअभावी ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना त्या विषयाची पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल,’ असे ट्विट केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!