MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी पसंतीचे केंद्र निवडीची संधी
Opportunity To Choose The Center For Engineering Services Pre-examination
MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी पसंतीचे केंद्र निवडीची संधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत नव्याने परीक्षा केंद्र निवडता येणार आहे
MPSC : उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन
एमपीएससी’तर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेद्वारे 217 पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सुरूवातीला ही परीक्षा 17 मार्च रोजी होणार होती, पण कोरोनामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान अर्ज भरताना बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडले होते. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावाकडे गेलेले आहेत, ते पुन्हा या शहरांच्या ठिकाणी येऊन परीक्षा देण्यास तयार नाहीत. तसेच प्रवासात संसर्गाचा धोका आहे तर, जेवण, निवासाची व्यवस्थाही करावी लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती.
MPSC ने जाहीर केली नवीन गुणपद्धती; विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काय आहे नेमका बदल
“एमपीएससी’ने 17 सप्टेंबर दुपारी दोन ते 22 सप्टेंबर रात्री 23.59 पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या कायमस्वरूपी पत्त्याच्या जवळचे महसुली विभागाच्या मुख्यालयाच्या केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे परीक्षा केंद्र मिळेल. संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यास आयोगाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या केंद्रावर परीक्षा देणे अनिवार्य आहे.