अठरा ते तीस वर्षांतील युवक-युवतींना रोजगारांची संधी

PCMC Light House Project For Youth

Pimpri – You are 18 to 30 years old, you are unemployed, you want to stand on your own feet and start your own business. The ‘Light House’ project will be implemented by the Municipal Corporation’s Urban Development Planning Department and the Light House Community Foundation.

अठरा ते तीस वर्षांतील युवक-युवतींना रोजगारांची संधी; ‘लाइट हाउस’ प्रकल्प

 पिंपरी -तुमचे वय १८ ते ३० वर्षांतील आहे, तुम्ही बेरोजगार आहात, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जागा हवी आहे, प्रशिक्षण हवे आहे, अन्य मूलभूत सुविधा हव्या आहेत, तर मग घाबरू नका… आता या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या समस्या सुटणार आहेत. त्याही अगदी मोफत, मग, तुम्ही युवक असा अथवा युवती. हवी फक्त तुमची इच्छाशक्ती. कारण, तुमच्या रोजगारासाठी महापालिकेने आणला आहे ‘लाइट हाउस’ प्रकल्प.

महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१९ मध्ये केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर २०१९ मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्य%Eनंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोA4ाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असा असेल प्रकल्प

 • काय – लाइट हाउस प्रकल्प
 • कशासाठी – रोजगार निर्मितीसाठी
 • कोणासाठी – १८ ते ३० वर्षांतील युवक-युवती
 • कसा – सीएसआर फंडातून मोफत
 • कुठे – सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
 • कालावधी – किमान तीन वर्षे

सोर्स: सकाळ

3 Comments
 1. Saraswati bhikaji Kharat says

  I have a interested ( light house praklp)

 2. Swapnil ganesh kolte says

  Nice👍

 3. Pushpa says

  खुप छान कल्पना आहे मला पण संधी मिळाली तर खुप छान होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!