पीएमपी चालक, वाहकांची सरळसेवेने बढती

PMPML Bharti 2020

पीएमपी चालक, वाहकांची सरळसेवेने बढती

पुणे महानगर परिवहन महामंडळात सध्या चालक, वाहकपदी कार्यरत कर्मचाऱ्यांना बढती मिळणार आहे. खात्याअंतर्गत सरळसेवेने ती दिली जाणार असून, याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत 13 डेपो असून, सुमारे 10 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 2013 साली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेने महामंडळाचा आस्थापना आरखडा तयार केला होता. याप्रमाणे प्रशासनाकडून बढती प्रक्रिया राबविण्यात येते. यानुसार प्रशासनाने खातेंतर्गत सरळसेवेने पात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.

यांतर्गत अटी आणि शर्थींप्रमाणे चालक, वाहकांना ड्रायव्हर चेकर, सहायक गॅरेज सुपरवायझर, गॅरेज सुपरवायझर, सहायक टाइम किपर या पदावर बढती देण्यात येणार असून, यासाठी अर्जदेखील मागविले होते. सुमारे 50 जागांवर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. यासाठी मार्च 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीतील हजेरीचा तक्‍ता, डिफॉल्ट रेकॉर्ड आदींची माहिती प्रशासनाने मागविली आहे. या प्रक्रियेसाठी निवड समिती गठीत केली जाणार आहे. या समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे.

सोर्स: प्रभात

1 Comment
  1. Vaibhav Yelave says

    Dear sir and Madam
    PMPML madhe conductor bharati chalu ahe ka Majhya kade conductor batch ahe mla apply karcha ahe conductor job sathi
    Please reply me

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!