पुणे महापालिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या ९५ टक्के जागा रिक्त

Pune Mahangarpalika Vacancy

 पुणे महापालिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या ९५ टक्के जागा रिक्त

Pune Mahangarpalika Vacancy 2021: In Pune Mahanagarpalika About 95% of the posts vacant. such a situation, it would be childish to expect the municipality to deal with a deadly epidemic like corona; But the budget does not appear to have taken any concrete steps to improve it. Out of 151 sanctioned seats, 144 are vacant

 पुणे – महापालिकेने मंजूर केलेल्या १५१ पैकी जेमतेम ७ तज्ज्ञ डॉक्टरांवर सध्या शहराची आरोग्य सेवा सुरू आहे. कोरोनाचा देशातील सर्वांत मोठा उद्रेक होऊनही ही स्थिती बदलण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल प्रशासनाने टाकले नाही. खरं तर बिगाऱ्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्व हक्काचे मनुष्यबळ महापालिकेचे असावे, यासाठी साधा प्रयत्नही केला नसल्याचे महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकातून दिसते. इतर डॉक्टर करार पद्धतीने वैद्यकिय सेवा देतात.

देशात कोरोना उद्रेक झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने आरोग्यावरील खर्च १३७ टक्क्यांनी वाढवला. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक संख्येच्या पुण्यात आरोग्यावरील खर्चात भरीव तरतूद करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या प्रारूप अंदाजपत्रकात आरोग्यावरील खर्चाला प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. एकूण अंदाजपत्रकाच्या जेमतेम ४.७० टक्के तरतूद आरोग्यासाठी प्रस्तावित केली. त्यामुळे कोरोनाचा देशातील सर्वाधिक उद्रेक पुण्यात होऊनही त्यातून महापालिकेने कोणताही धडा घेतला नाही, हेच दिसते.

 कोरोनाच्या उद्रेकात सर्वांत महत्त्वाचे ठरले ते वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ. त्यात प्रशिक्षित परिचारिका, तंत्रज्ञांपासून तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंतचा समावेश होता. हे सर्व हक्काचे मनुष्यबळ महापालिकेत सध्या नाही. महापालिकेच्या आरोग्य खात्यात ९१ पदांना मंजुरी दिली आहे. वर्ग एकपासून चारपर्यंतच्या पदांचा समावेश होतो. त्यापैकी फक्त ५५ टक्के पदे भरलेली आहेत. उर्वरित सर्व पदे रिक्त असल्याने महापालिकेची आरोग्य सेवा ‘अशक्त’ झाल्याचे निदान सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

 तज्ज्ञ डॉक्टरांच्या ९५ टक्के जागा रिक्त

आरोग्य सेवेचा कणा असलेल्या डॉक्टरांच्या ९५ टक्के महापालिकेतील जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत महापालिकेने कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजाराचा मुकाबला करावा, अशी अपेक्षा ठेवणे बाळबोधपणा ठरेल; पण यात सुधारणा करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल अंदाजपत्रकात उचलल्याचे दिसत नाही. मंजूर केलेल्या १५१ पैकी १४४ जागा रिक्त आहे.

 साथरोगांचा इतिहास काय सांगतो?

कोरोना हा पुण्यात आलेला पहिला साथीचा रोग नाही. सुमारे २५२ वर्षांपासून वेगवेगळ्या आठ महाभयंकर साथीच्या रोगांचा पुण्यात उद्रेक झाला. त्यात १७६९ च्या देवीच्या साथीपासून २००९च्या स्वाइन फ्ल्यूपर्यंतच्या उद्रेकाचा समावेश होतो; पण या प्रत्येक साथीनंतर पुण्याच्या आरोग्य सेवेचा पाया विस्तारला. ती अधिक भक्कम झाली. पुण्याचा हाच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्थायी समितीने आरोग्य क्षेत्रात भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज असल्याचे अधोरेखित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!