पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून

Pune University Exam

Pune University Exam: ‘The first session examination will start from April 11. That schedule will be announced between March 20 and 25. An online examination of 50 marks will be conducted for all the final year courses using Multiple Choice Question-MCQ.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून निर्माण झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी मंगळवारी (ता.९) झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. ही परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन- एमसीक्यू) पद्धतीने ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाची स्वतःची ‘एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी परीक्षा घेणार आहे.

 ‘प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू केली जाईल. त्या वेळापत्रक २० ते २५ मार्च दरम्यान जाहीर होईल. ही विद्यापीठाची स्वतःची कंपनी असलेली एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी घेईल. ५०ः२० चे सूत्र रद्द करण्यात आले असून, सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षांच्या परीक्षा ५० गुणांची एमसीक्यू पद्धतीने होईल.


Pune University Exam: Savitribai Phule Pune University’s first-year session examination is being investigated by the end of February and the online method will be given priority to conduct this examination on time. When taking the exam online, it is likely to ask MCQ and a wide range of questions.

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारीअखेर

Pune University Exams : pune university first year semester exams likely to be conducted in February – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रवारीच्या अखेरीस घेण्याबाबत पडताळणी सुरू असून, या परीक्षा वेळेत पार पाडण्यासाठी ऑनलाइन पद्धतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना, त्यात एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे. याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे. त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे.

याउलट ऑफलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजन केल्यास, साधारण दोन महिने परीक्षा घेण्यासाठी लागतील; तसेच निकाल जाहीर करण्यास ४५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता ऑनलाइन परीक्षा घेणे सोयीस्कर ठरेल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासोबतच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची पक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत पडताळणी सुरू आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सत्र परीक्षांचे प्रस्तावित नियोजन

  • जानेवारी – अर्ज भरण्याची प्रक्रिया
  • फेब्रुवारीअखेरीस – परीक्षांना सुरुवात
  • मार्च – परीक्षा पूर्ण होणे
  • एप्रिल – निकाल जाहीर होणे

सोर्स : म. टा.


Pune University Bharti 2019 Date Extended

Pune Vidyapeeth Professor Bharti process will be expected soon. Recruitment of vacant posts in Pune universities and colleges is a matter of concern. The University Grants Commission has given instructions for this recruitment to maintain the quality of education, but for the fourth time, the Commission has to withdraw the reminder as it is not implemented. Also, a November 10 deadline has been given to complete the recruitment. As a reminder of the Commission’s failure to implement it, serious attention has been taken. The ultimatum is given on November 10th to complete the recruitment process and inform the Commission.

रिक्त जागा भरण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदत

आयोगाच्या या स्मरणपत्रानुसार अंमलबजावणी होत नसल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भरतीप्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला देण्यासाठी दहा नोव्हेंबर हा अल्टिमेटम दिला आहे.
पुणे – विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील रिक्त जागांवरील रखडलेली भरती हा चिंतेचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी ही भरती करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आहेत, तरीही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आयोगाला चौथ्यांदा याबाबत स्मरणपत्र काढावे लागले आहे. तसेच, भरती पूर्ण करण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदतही दिली आहे.
अध्यापकांच्या अपुऱ्या संख्येमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे कारण देत आयोगाने जूनपासून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देशातील विद्यापीठांना दिल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरतीदेखील अपेक्षित होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सांगितले होते. परंतु प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आयोगाने पुन्हा जुलैत, नंतर ऑगस्टमध्ये भरतीप्रक्रियेबाबत स्मरण करून दिले होते.
आयोगाच्या या स्मरणपत्रानुसार अंमलबजावणी होत नसल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भरतीप्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला देण्यासाठी दहा नोव्हेंबर हा अल्टिमेटम दिला आहे. यासंबंधीचे एक पत्र प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले आहे. आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी पाठविलेल्या पत्रात कारवाईचा इशाराही दिलेला आहे. प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत विलंब केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच, संबंधित संस्थांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जैन यांनी नमूद केले आहे.

भरतीसाठी लागते समितीची परवानगी
भरतीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी अनेक महाविद्यालयांकडून मागणी केली जाते; परंतु सरकारी स्तरावरून त्यास मान्यता दिली जात नाही, त्यामुळे भरती रखडल्याचे शिक्षण संस्थांकडून सांगितले जाते. याबाबत उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, “”आयोगाने भरतीसाठी अंतिम मुदत दिली आहे. परंतु राज्यातील भरतीसाठी उच्चस्तरीय समितीची परवानगी लागते. त्यानंतर भरती होऊ शकते.” उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सौर्स : सकाळ
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!