Pune University Professor Recruitment Process
Pune University Professor Recruitment Process
प्राध्यापक भरती प्रक्रियेला खीळ
सहाय्यक प्राध्यापकांची भरती म्हणजे ‘बिनवासाची अगरबत्ती’!
प्रस्ताव न आल्याने प्रक्रिया ठप्प / Professor Recruitment Related Issue
सहा महिन्यांपूर्वी राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने या विद्यापीठांना त्यांचे रोस्टरचे काम पूर्ण करून प्राध्यापक भरतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. राज्यातील १५ विद्यापीठांपैकी केवळ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या दोन विद्यापीठांनी रोस्टरचे काम पूर्ण करून प्रस्ताव पाठविले आहेत. प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरित सर्व विद्यापीठांकडूनही प्रस्ताव दाखल होणे आवश्यक आहेत. मात्र, ते प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाकडे आले नसल्याने ही प्रक्रिया ठप्प आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे – राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या ६५९ प्राध्यापकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्यातील १५ पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे.
ऐकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची आरोड होत असताना दुसरीकडे विद्यापीठांची उदासीनता समोर आली आहे.
राज्यात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज अभिमत यासह १२ अकृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची एकूण २ हजार ५३४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १ हजार ३८८ पदे भरलेली आहेत. १ हजार १६६ पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे एकाच वेळी भरणे शक्य नसल्याने सरकारने ४० टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली होती. या विद्यापीठांमधील ६५९ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
सौर्स : सकाळ