Pune University Will Change Examination System Due to Corona virus
Pune University Will Change Examination System Due to Coronavirus
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार; पण स्वरूप बदलणार
Pune: Savitribai Phule Pune University (SPPU) is mulling upon alternative ways to conduct examinations for students at university and its affiliated colleges. Due to 21 days nation-wide lockdown, the university has cancelled all the exams till April 14.
On March 27, SPPU’s Board of Examination and Evaluation had issued a notification stating that all the exams which were to be held till April 14 have been postponed till further orders. A new schedule will be released when the university resumes work. In another circular, the university also declared interim vacation for students, faculty members and staff from April 1 to14.
Speaking to Sakal Times, Vice-Chancellor Nitin Karmalkar said, “Given the situation, we won’t be able to conduct the examinations in regular format, we have to bring some innovative ways to conduct it now. We are thinking of ways like maybe assessment and evaluation. The students’ academic performance can be reviewed or by giving some assignments or taking an online examination. But in online examination, the question format will mostly be objective.
लॉकडाऊन संपल्यानंतर १० दिवसांनी परीक्षा
लॉकडाऊन नंतर विद्यापीठाला परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे. तसेच काही वर्गांचा अभ्यासक्रम किंवा प्रोजेक्ट, प्रॅक्टीकल सबमीशन राहिले असल्याने त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर किमान १० दिवसाच्या कालावधीनंतर परीक्षा सुरू होतील, असे उमराणी यांनी सांगितले.
‘कोरोना’मुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडले असले तरी भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही. परंतु, परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर १ एप्रिल ते १४ एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
‘कोरोना’ संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या पूर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तर पदव्युत्तर व व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ‘कोरोना’मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागविल्या होत्या. त्यात १०० पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करून नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाईल.
सोर्स :सकाळ