रेल्वे भरती बोर्ड परीक्षा: पॅटर्न आणि सिलॅबस
Railway Recruitment Board Exam: Patterns and Syllabus
रेल्वे भरती बोर्ड परीक्षा: पॅटर्न आणि सिलॅबस
जेईई मेन आणि नीट परीक्षांचं यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर रिक्रुटिंग एजन्सी करोना काळात भरती परीक्षांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) देखील आता विविध परीक्षा घेण्याच्या तयारी आहे. या परीक्षांमध्ये CBT-1 आणि CBT-2 सारख्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षांचा समावेश आहे.
या परीक्षांच्या तारखा बोर्डाकडून वेळोवेळी जाहीर केल्या जातील.
NTPC अंतर्गत भरली जाणारी पदे
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर टाइम कीपर, ट्रेन्स क्लर्क, कमर्शिअल कम तिकीट क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सिनिअर कमर्शिअल कम तिकीट क्लर्क, सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर टाइम कीपर, कमर्शिअल अप्रेंटिस आणि स्टेशन मास्तर ही रेल्वेच्या विविध झोनल रेल्वे आणि प्रोडक्शन युनिटमधील पदे.
RRB NTPC 2020 परीक्षा पॅटर्न
दोन टप्प्यातील संगणक आधारित परीक्षा असते. स्टेशन मास्तर, ट्रॅफिक असिस्टंटसारख्या पदांना संगणक आधारित अॅप्टिट्यूड स्कील टेस्ट असते. टायपिंग स्कील टेस्टही संबंधित पदांसाठी होते. त्यानंतर कागदपत्रं पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील होते.
परीक्षेचा कालावधी – एकूण ९० मिनिटे
सामान्य ज्ञान प्रश्न – ४० प्रश्न
गणिताचे प्रश्न – ३०
जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग प्रश्न – ३०
एकूण प्रश्नांची संख्या – १००
PwBD (दिव्यांग) उमेदवारांसाठी परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा कालावधी असतो.
सीबीटी – १ छाननी परीक्षेप्रमाणे असते. या परीक्षेतील स्कोरनुसार सीबीटी – २ परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरतात.
नकारात्मक मूल्यांकन
सीबीटी परीक्षांमध्ये नकारात्मक मूल्यांकन असते. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा होतात.
RRB NTPC 2020 सिलॅबस – (सीबीटी – १साठी)
गणित – नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, रेशिओ आणि प्रपोर्शन्स, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कम्पाउंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री अँड ट्रिगोनोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स जनरल इंटलिजन्स अँड रिझनिंग – अॅनालॉजिज, कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, रिलेशनशीप्स, अॅनालिटिकल रिझनिंग, सिलोगिझम, जम्ब्लिंग, वेन डायग्राम्स, पझल, डेटा सफिशिएन्सी, स्टेटमेंट – कन्क्लुजन, स्टेटमेंट – कोर्सेस ऑफ अॅक्शन, डिसिजन मेकिंग, मॅप्स, इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स. सामान्य ज्ञान: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा, कला, भारतीय संस्कृती, साहित्य, ठिकाणं, स्मारकं., सीबीएसई दहावीपर्यंतचे विज्ञान, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, भारताची आणि जगाची सामाजिक, आर्थिक सीमा, भारतीय वाहतूक व्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रसिद्ध भारतीय आणि जागतिक स्तरावरील व्यक्ती इत्यादी.