RTE Admission-करोनाने पालक गमावलेल्या पाल्यांना “आरटीई’ प्रवेश
RTE Admission Process 2023-2024 Online Registration
New and Latest updates regarding the RTE Admission 2023-2024 is here. The government has decided to give admission to children who have lost their parents due to Corona to reserved seats under the admission process under the Right to Education Act (RTE). The online application process for admission to 25% reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) has started from 3 pm on Wednesday (1st March 2023) Tthe admission process will be implemented till March 17 and the education department has given strict instructions that no application will be considered after the deadline.
करोनाने पालक गमावलेल्या पाल्यांना “आरटीई’ प्रवेश
करोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी (दि.1) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झाली आहे. दि. 17 मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेणार नसल्याच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
RTE Admission Process 2023-2024
- दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
- या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- पालकांना https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.
- शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया भरण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
- त्यानुसार करोना काळात म्हणजे एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
- अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर मदत केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
- दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी जन्म तारखेचा पुरावा- जन्मदाखला, पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, निवासी पुरावा- रेशन कार्ड, वाहन परवाना, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत.
How to registered in RTE Portal
- “आरटीई” अंतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा.
- अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी.
- आरटीईअंतर्गत 25 टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- आर्थिक वर्षात पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो.
- 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने 17 मार्चपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर सोडत काढण्यात येईल.
- पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे.
RTE Online Admission Link 2023-2024
Corona Issue – RTE Admission Process 2023-2024 Online Registration