सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

Sakal India Foundation Scholarship For Students

Sakal India Foundation Scholarship For Students : Students residing in the districts of Vidarbha in government and economically low income group Sakal India Foundation, a first year student of Engineering, Medical, Architect, Nursing, Science, Arts and Commerce, who scored more than 85% marks in Class XII examination in March 2020, is awarding scholarships to a student from Vidarbha in memory of Narayan and Sudha Bansod.

 सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

पुणे – सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि विद्यार्थीनीला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे, फाउंडेशनने सांगितले. बनसोड कुटुंबियांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळेल.

 अर्ज कोण करू शकतो

शासकीयदृष्ट्या विदर्भातील जिल्ह्यांतील रहिवासी असलेले आणि आर्थिक दृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी
मार्च २०२० मध्ये बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेला विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्त%Eविशारद, नर्स%0ंग, विज्ञान, कला आणि वाणिज्य शखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी

 असा करा अर्ज

पात्र विद्यार्थ्यांनी अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इमेल यांचा उल्लेख करावा. सोबत बारावीच्या गुणपत्रिका, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांचे झेरॉक्स जोडावे.

 अंतिम मुदत

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ः २० फेब्रुवारी २०२१

 अर्जाचा पत्ता 

पत्ता ः सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, साखर संकुलाशेजारी, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
दूरध्वनी क्रमांक ः ०२०-२५६०२१०० (एक्स्टेंशन १७४)
ई-मेल ः [email protected]
किंवा  [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!