सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार
Saral Seva Bharti Recruitment 2020
Saral Seva Bharti Recruitment 2020: Thousands of young people in the state are eyeing ‘MahaIT’ for the recruitment of class two and three posts in the state service. Officials assured that the tender process would be completed by August 10 and the recruitment process would begin. Under Saral Seva, various posts in Zilla Parishad are filled by Health Servants, Peon, Clerk, Gram Sevak, Krishi Sevak, Police, Talathi, and above in various departments of the State Government.
सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार
राज्यातील हजारो तरुण राज्य सेवेतील वर्ग दोन आणि तीनच्या पदांची भरती व्हावी म्हून ‘महाआयटी ‘ कडे डोळे लावून बसले आहेत. यासाठीच्या निविदेचे काम १० ऑगस्ट पर्यंत पूर्ण होऊन पदभरतीची प्रक्रिया सुरु होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद आरोग्य सेवक, शिपाई, कारकून, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस , तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर दोन व तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. डमी उमेदवार बसवून, गुणांमध्ये अफरातफर करून गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची निवड झाली. त्याचे पुरावेही समोर आले.
महापरीक्षा पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने हे पोर्टल बंद करा या मागणीने जोर धरला होता. अखेर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी ‘महाआयटी’तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. मात्र, दरवेळेला वेगवेगळी कारणे देऊन निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात आहे. आत्तापर्यंत १९ वेळा मुदतवाढ दिल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, ते हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाआयटीचे प्रमुख अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. निविदा प्रक्रिया पूर्ण कधी होणार आहे असे विचारले असता, पाटील यांनी, “१० ऑगस्टपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले आहे. त्यामुळे विविध खात्यातील भरती मार्गी लागण्याची शक्यता आहे.
यादव म्हणाले, “सरळ सेवेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, पण महापरीक्षा पोर्टलच्या ठिकाणी काम करण्यास दुसऱ्या कंपन्यांना उशीर लागत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यास उमेदवारांना थोडासा तरी दिलासा मिळेल.”
Hi sir, my completed diploma in civil engineering,
2011 I had completed Diploma In Electronics And Telecommunication