Sarthi Bharti  -सारथी’ची पद भरती महिन्याभरात -मराठा तरुणांना नोकऱ्या देणार

Sarthi Maharashtra Bharti 2022

A proposal to create majority of posts for SEBC, ESBC and EWS candidates recommended before the Maratha reservation was postponed was taken up in the Cabinet and a positive decision was taken in a meeting chaired by Chief Minister Uddhav Thackeray on the demands of Sarathi and Annasaheb Patil Economic Backward Development Corporation. Meanwhile, after Minister Dilip Walse-Patil, Eknath Shinde and Amit Deshmukh went to the fasting place at Azad Maidan and informed MP Sambhaji Raje Chhatrapati about the decision, MP Sambhaji Raje has called off the fast-unto-death which started for three days. Skill development programs from Sarathi will be started in a month.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सारथी पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती -थेट लिंक व्दारे करा अर्ज

गेल्या तिन दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण अखेर खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी मागे घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यावर मंत्री दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना या निर्णयाची जाहीर माहिती दिली. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील मागण्यांवर निर्णय झाला. या मागण्यांबरोबर नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या ते जाणून घेऊया.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा समाज आंदोलनातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली. दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे-

  • सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरु करण्यात येणार.
  • सारथी संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत तयार करणार.
  • सारथीमधील रिक्त पदे दि.१५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सारथी संस्थेच्या राज्यभरातील आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मंजूर ८० कोटी निधी मिळाला आहेत. उर्वरित रु. २० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • व्याज परताव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करुन तातडीने व्याज परतावा मिळणार. तसेच क्रेडिट गॅरंटीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
  • परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत धोरण तयार करण्यात येत आहे.
  • व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत रु.१० लाखांवरून रु.१५ लाख करण्यात आलेली आहे.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर दोन महामंडळांवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती होणार. त्याशिवाय संचालक मंडळाची आणि आवश्यकतेनुसार इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • जिल्ह्यांतील तयार असलेल्या वसतीगृहांचे येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्धाटन करण्यात येणार आहे.
  • कोपर्डी खून खटलाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्यासाठी महाधिवक्त्यांना विनंती करून दि. २ मार्च, २०२२ रोजी प्रकरण मेंन्शन करण्यात येईल.
  • रिव्ह्यू पिटीशनची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पंधरा दिवसात अर्ज करण्यात येईल त्याबाबतचे प्रकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे हाताळतील.
  • मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा दरमहा गृह विभागाकडून आढावा बैठक घेण्यात येईल. प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेवून तसेच ज्या आंदोलनात व्हिडीओ फुटेजमध्ये ज्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेवून प्रकरण निहाय त्याचा निर्णय घेण्यात येईल.
  • मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबर २०२० च्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या परंतु ९ सप्टेंबर २०२० नंतर सुधारित निवड यादीनुसार जे एसईबीसी, ईएसबीसी व इडब्ल्युएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडतील त्यांच्यासाठी पदे निर्माण करुन त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव एक महिन्यात मंत्रीमंडळापुढे सादर होणार.
  • मराठा आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसदारांना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याच्या उर्वरित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन संबंधित उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना तात्काळ नोकरी देण्याचा निर्णय.

SARTHI Maharashtra Bharti 2022: The recruitment process for the 273 posts required for Sarathi’s organization will be done within a month. The state government has decided to set up an independent dedicated backward class commission to study the backwardness of the Maratha community. Read More details as given below.

SARTHI Maharashtra Bharti 2022

 ‘सारथी’ची पद भरती महिन्याभरात -एकूण २७३ पदे 

मराठा समाजासाठी मागासवर्ग आयोग

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

SARTHI Maharashtra Recruitment 2022

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  गृह मंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल,  असे निश्चित करण्यात आले.

SARTHI Maharashtra Bharti 2022

सारथी’ची पद भरती महिन्याभरात

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असून, त्यावर तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. सारथी’ संस्थेसाठी आवश्यक असलेल्या 273 पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली  जाईल.

इतर वसतिगृहेही सुरू

करण्यासाठी प्रयत्न

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत ठाणे, पुणे, कराड, मिरज, कोल्हापूर, नाशिक व नगर येथील वसतिगृहे वापरासाठी सज्ज असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!