महाराष्ट्रातील १० हजार विद्यार्थ्यांना नागरी सेवा प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप

Scholarship For IAS Training

महाराष्ट्रातील १० हजार विद्यार्थ्यांना नागरी सेवा प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप

IAS Training: Vedihik IAS Academy will give scholarships to 10,000 students in Maharashtra for civil service training …Vedhik IAS Academy has decided to impart training to 10,000 students in Maharashtra. The new regional center of the academy has started in Pune.

महाराष्ट्रातील १० हजार विद्यार्थ्यांना नागरी सेवा प्रशिक्षणासाठी वेदिक आयएएस अकॅडमी स्कॉलरशिप देणार आहे…

IAS Training: वेदिक आयएएस अकॅडमीने महाराष्ट्रातील १० हजार विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अकॅडमीचं नवं प्रादेशिक केंद्र पुण्यात सुरू झालं आहे.

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत अकॅडमीने ही माहिती दिली. वेदिक आयएएस अकॅडमीचं मुख्यालय कोची येथे आहे. अकॅडमीने महाराष्ट्रात वेदिक एरुडिएट स्कॉलरशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अकॅडमीचे ऑफ-कॅम्पस सेंटर्सदेखील सुरू होणार आहेत.

इयत्ता आठवी ते वय वर्ष ३२ पर्यंतच्या सर्व इच्छुक उमेदवारांना नागरी सेवा प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध आठ भाषांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अलेक्झांडर जेकब हे केरळचे माजी पोलीस महासंचालक आहेत. हे प्रशिक्षण नामवंत तज्ज्ञांमार्फत दिले जाईल, असे संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

UPSC IFS Main 2020 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२० (Indian Forest Service Main Exam 2020) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. UPSC IFS 2020 परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी असणार आहे. पहिल्या दिवशीच्या परीक्षेत जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे पेपर्स असतील. सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. अखेरचा पेपर रविवार ७ मार्च २०२१ रोजी असेल.

1 Comment
  1. Vikram says

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!