शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड
Shikshak Bharti Selection List
In the teacher recruitment process, 196 teachers have been selected for the ninth to twelfth classes through the holy website. The list of selected teachers has been announced on the website
Shikshak Bharti- पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!
Shikshak Bharti-शिक्षण विभागात प्राचार्यांची पदे रिक्त
शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड
शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळाद्वारे नववी ते बारावीच्या वर्गांसाठी १९६ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांची यादी संके तस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या पूर्वी निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीवेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण आणि उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेत (टेट) गुण असूनही काही उमेदवारांच्या माहितीमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी निवड झाली नव्हती. अशा उमेदवारांसाठी ही फेरी घेण्यात आली. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.