Solapur Fire Bharti-सोलापूर ‘अग्निशामक’मध्ये ३५ फायरमॅनची भरती!

Solapur Fire Brigade Bharti 2023 - Notification & Apply Link

Solapur Fire Brigade Bharti 2023

The fire department in the smart city Solapur is running on 8 vehicles and 36 workers. It is a fact that many people are not able to get timely help. In this background, 2 new fire brigade vehicle are going to be purchased by getting funds through the District Planning Committee. Also, 35 fireman posts are going to be filled by the end of March 2023. A separate center of fire department will be started near the water tank in Akkalkot MIDC. Therefore, if there is a fire anywhere in the industrial estate, it will be possible to reach there in just 5-6 Minutes. Read the complete details about Solapur Fire Brigade Bharti 2023 given below and keep visit us..

सोलापूर ‘अग्निशामक’मध्ये ३५ फायरमॅनची भरती!

  • साडेबारा लाखांहून अधिक लोकसंख्या (अंदाजित तीन लाख घरे) असलेल्या स्मार्ट सिटीतील अग्निशामक विभागाचा कारभार आठ गाड्या आणि ३६ कामगारांवर सुरु आहे. त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आमदार सुभाष देशमुखांनी त्यावर अधिवेशनात आवाज उठवताच आता त्याच्या सक्षमीकरणाचा विषय महापालिकेने हाती घेतला आहे.
  • सोलापूर शहरात अग्निशामक विभागाची पाच केंद्रे आहेत. पण, आता सोलापूर शहराचा विस्तार वाढल्याने त्या केंद्रांवरून शहराच्या दुसऱ्या टोकाला पाण्याचे बंब घेऊन जाण्यासाठी विलंब लागतोय. त्यामुळे अग्निशामक विभाग तेथे पोचेपर्यंत घटनास्थळी होत्याचे नव्हते झालेले असते. २०२३ मध्ये अडीच महिन्यांत नुसत्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत आठ घटना आगीच्या घडल्या आहेत.
  • या पार्श्वभूमीवर आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवून दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तसेच मार्चअखेर ३५ फायरमॅनची पदे भरली जाणार आहेत. अक्कलकोट एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळ अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोठेही आग लागल्यास अवघ्या पाच ते आठ मिनिटात त्याठिकाणी पोचणे शक्य होणार आहे. सध्या १० ते १४ मिनिटे लागतात. पण, त्यानुसार कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण होणार की आगीच्या घटनांमध्ये आणखी नुकसानच पाहावे लागणार, हे आगामी काळच ठरवेल.
  • दोन गाड्या वाढतील; एमआयडीसीत एक केंद्र वाढणार – सोलापूर शहरात अग्निशामक विभागाचे पाच सेंटर असून आठ गाड्या आहेत. अग्निशामक विभाग अधिक सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आणखी दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तर एमआयडीसीत आणखी एक केंद्र वाढविण्याचे नियोजन केले आहे. – केदार आवटे, अग्निशामक विभागप्रमुख, सोलापूर महापालिका
  • आमदार सुभाष देशमुखांनी मांडली उद्योजकांची बाजू – सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत फेब्रुवारी महिन्यात आठ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जवळपास तीनशेहून अधिक कामगारांचा उदरनिर्वाह बंद पडला आहे. दुसरीकडे कारखानदार तथा उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • आग लागल्यानंतर त्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही सोलापूर महापालिकेची अग्निशामक दल तेवढे सक्षम नसल्याने मदत वेळेत मिळाली नाही. त्यासंदर्भात राज्य सरकारने सकारात्मक विचार करून त्या उद्योजकांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानंतर पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ४) सोलापुरात बैठक देखील पार पडली. त्यावेळी अग्निशामक दल अधिक सक्षम करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.

Solapur Mahanagarpalika – सोलापूर महापालिकेत निघणार ३४० पदांची नोकरभरती

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Solapur Fire Brigade Bharti 2023 – Notification & Apply Link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!