विद्यापीठ बदलणार परीक्षेचा पॅटर्न; “असा’ असणार गुणांचा अन्‌ परीक्षेचा नवा फॉर्म्युला 

Solapur University Will Change the Pattern of Examination

Solapur University Will Change the Pattern of Examination: Punyashlok Ahilya Devi Holkar is going to change the pattern of Solapur University examination for the purpose of making it easier for the students of our university to compete with the students of other universities in the state. According to this, 20 marks will be given by the colleges and two examinations of 40 marks each, one offline and one online will be conducted.

विद्यापीठ बदलणार परीक्षेचा पॅटर्न; “असा’ असणार गुणांचा अन्‌ परीक्षेचा नवा फॉर्म्युला

 राज्यातील अन्य विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी आपल्याही विद्यापीठाचे विद्यार्थी सहजपणे स्पर्धा करू शकतील, नोकरी- व्यवसायात अव्वल राहतील, या हेतूने आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षेचा पॅटर्नच बदलणार आहे. त्यानुसार 20 गुण महाविद्यालयांकडून दिली जातील तर प्रत्येकी 40 गुणांच्या दोन परीक्षा, एक ऑफलाइन तर एक ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

 पारंपारिक पद्धतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या जातात. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन परीक्षेचा प्रयोग करण्यात आला. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठाची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केला आहे. आता जळगाव व स%Aलापूर विद्यापीठ वगळताअन्य कोणत्याही विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू झालेल्या नाहीत, असे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी यापूर्वी आवर्जून सांगत होते. सोलापूर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत, या हेतूने आता परीक्षेचा पॅटर्न बदलण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्‍त करून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

 दरम्यान, परीक्षेचा पॅटर्न बदलण्यासंदर्भात विद्यापीठाने तयारी केली असून त्यासंदर्भात अन्य विद्यापीठांमधील तज्ज्ञांशी व महाविद्यालयांमधील प्राचार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ऑक्‍टोबर- नोव्हेंबरच्या परीक्षेत याचा पहिला प्रयोग होऊ शकतो, असेही विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 नियोजित बदलासंदर्भातील ठळक बाबी…

  • वर्णनात्मक प्रश्‍नांसाठी घेतली जाईल ऑफलाइन परीक्षा; पारंपरिक पॅटर्न बदलणार
  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विचारले जातील अभ्यासक्रमातील बहुपर्यायी प्रश्‍न
  • 20 गुण कॉलेज स्तरावर दिले जातील; प्रत्येकी 40 गुणांच्या होतील ऑनलाइन-ऑफलाइन परीक्षा
  • ऑनलाइन परीक्षा घरबसल्याच होईल तर ऑफलाइन परीक्षा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये घेण्याचे नियोजन
  • नव्या पॅटर्नबद्दल प्राचार्यांच्या बैठकीनंतर होईल शिक्‍कामोर्तब; एक सत्र ऑनलाइन तर एक सत्र ऑफलाइन यादृष्टीनेही नियोजन
  • स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नव्या पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची होईल तयारी; निविदाद्वारे तज्ज्ञांची होईल निवड

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!