केंद्र सरकारी नोकरीची संधी; हजारो रिक्त पदे

केंद्र सरकारी नोकरीची संधी; हजारो रिक्त पदे

SSC CGL Recruitment 2021: There is Good News For  Graduates Candidates as Staff Selection Commission (SSC) has published the notification for Combined Graduate Level Group ‘B’ and Group ‘C’ posts in various Ministries/ Departments/ Organizations like  Assistants, Inspectors of Central Excise & Customs, Inspectors of Income Tax, Assistant Enforcement Officer, Tax Assistant, etc. There are 6506 (Tentative) vacancies to be filled under SSC Bharti 2020-2021.

स्टाफ सिलेक्शन कमिशन तब्बल सहा हजारहून अधिक रिक्त पदे भरणार आहे.

SSC CGL Notification 2020: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीची एक मोठी संधी पदवीधर तरुणांना चालून आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालय विभाग आणि अन्य संस्थांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या एकूण ६,५०६ पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेच्या (CGL 2020) माध्यमातून ही परीक्षा राबवण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करायचे आहेत.

या भरती परीक्षेची अधिसूचना २९ डिसेंबर रोजी जारी झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ डिसेंबर पासून सुरू झाली आहे.

पदांची माहिती

ग्रुप बी मध्ये गॅझेटेड श्रेणीची २५० पदे आहे तर नॉन गॅझेटेड श्रेणीची ३,५१३ पदे आहेत. ग्रुप सी मध्ये २,७४३ पदे आहेत. एकूण ६,५०६ पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

कर्मचारी निवड आयोगाच्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा २०२० साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किंवा अन्य संस्थेच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समकक्ष उत्तीर्ण असावेत. अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरला असणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र त्यांनी जानेवारी २०२० पर्यंत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

१ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान १८ आणि कमाल २७ वर्षे असावे. काही पदांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत असेल.

SSC CGL 2020 परीक्षेचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


SSC Recruitment 2020: Staff Selection Commission has issued the notification for the recruitment of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator Examination 2020. There are 283 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link. The closing date for submission of the online application form is 25th July 2020. More details about SSC JHT Bharti 2020 like application and application address are given below. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online.

SSC: नव्या भरतीचं नोटिफिकेशन जारी; १.४२ लाखांपर्यंत पगार

ज्युनियर आणि सिनीयर हिंदी अनुवादक पदांसाठी भरती होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही पदे भरली जाणार आहेत…

SSC JHT Bharti 2020 notification: कर्मचारी भरती आयोगाने (SSC) आपल्या नव्या भरती परीक्षांसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे. ही भरती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभांगांमध्ये केली जाते. ही भरती ज्युनियर आणि सिनीयर हिंदी अनुवादक (ट्रान्सलेटर) पदांसाठी होणार आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे.

या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षेचं आयोजन केलं जातं. ही ग्रुप बी ची बिगर-राजपत्रित पदे आहेत. अर्ज आणि पदांची माहिती तसेच नोटिफिकेशनची लिंक पुढे देण्यात आली आहे.

पदांची माहिती

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर / ज्युनिअर ट्रान्सलेटर – २७५ पदे

सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर – ८ पदे

एकूण पदांची संख्या – २८३

ही संभाव्य भरती आहे. गरजेनुसार पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.

या पदांवर नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना ३५,४०० रुपयांपासून १,४२,४०० रुपये प्रति महिन्यापर्यंत वेतन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या नियमांनुसार अन्य सुविधांचा लाभही मिळणार आहे.

अर्ज कसा कराल?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात २९ जून २०२० पासून झाली आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २५ जुलै २०२०
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २७ जुलै २०२०
  • ऑफलाइन चलान जनरेट करण्याची अंतिम मुदत – २९ जुलै २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
  • चलानद्वारे शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत – ३१ जुलै २०२०
  • कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेची तारीख (पेपर – १) – ६ ऑक्टोबर २०२०
  • डिस्क्रीप्टीव परीक्षेची तारीख (पेपर – २) – ३१ जानेवारी २०२१

SSC JHT Notification 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!