दहावी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ

SSC Exam 2021 Registration Online

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

 दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे काम अपुरे राहिले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाने दिलासा दिला आहे. बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठीच्या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे परिपत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. (maharashtra ssc exam registration application form 2021 last date extended till january 25)

आता दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकणार आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याअगोदर अर्ज भरण्यासाठी आज ११ जानेवारी पर्यंतच मुदत होती. ती वाढवून २५ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना वेबसाईट हॅक होण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज करणे राहिले आहे. आता मुदतवाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (maharashtra ssc exam registration application form 2021 last date extended till january 25) 


 

दहावी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात

SSC Exam 2021: The registration process for the Class X examinations of the State Board of Secondary and Higher Secondary is starting from Wednesday 23rd December 2020. Regular, re-examinees, private as well as all types of students who will appear for the examination under the grading scheme will be able to register online.

दहावी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात…

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया बुधवार २३ डिसेंबर २०२० पासून सुरु होत आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणार असलेले अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी करू शकणार आहेत.

नोंदणी कुठे करायची?
राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
    • नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१
    • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
    • माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत – २३ डिसेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१
    • माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत – ४ फेब्रुवारी २०२१

या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.

1 Comment
  1. Nikhil says

    Police

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!