स्टाफ सिलेक्शन कमिशन: स्टेनोग्राफर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

SSC Stenographer Exam 2019

The Staff Selection Commission has changed the schedule of Stenographer C and D Grade Examination 2019. The Commission has issued a circular in this regard on its official website. Accordingly, the stenographer examination, which will be held from December 24th to 30th, will now be held from December 22th to 24th.

स्टाफ सिलेक्शन कमिशन: स्टेनोग्राफर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर सी आणि डी ग्रेड परीक्षा २०१९ च्या वेळापत्रकात बदल केला आहे. यासंबंधी आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणारी स्टेनोग्राफर परीक्षा आता २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत होईल.

कर्मचारी निवड आयोग लवकरच एसएससी स्टेनोग्राफर परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करेल. म्हणूनच, प्रवेश पत्रांबाबतची अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट देत राहावी असे आवाहन आयोगाने केले आहे.

SSC Stenographer Exam 2019: अॅडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे?

  • – प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
    यानंतर, होम पेजवरील अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा.
  • – एक नवीन पेज स्क्रीनवर उघडेल.
  • – आता एसएससी स्टेनोग्राफर प्रवेशपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा.
  • – यानंतर विचारलेली माहिती भरा.
  • – सबमिट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • – एसएससी स्टेनोग्राफर प्रवेश पत्र आपल्या स्क्रीनवर उघडेल.
  • – आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट काढू शकता.

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!