सुप्रीम कोर्टमध्ये निघाली भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
Supreme Court of India Vacancy 2020
सुप्रीम कोर्टमध्ये निघाली भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
सुप्रीम कोर्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. जर तुम्ही बीई किंवा बी.टेक केलं आहे, किंवा एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स केलं आहे, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
रिक्त पदांसाठीच्या आवेदन प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या भरतीबाबतची जाहिरात, अर्ज याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.
या पदांसाठी होणार भरती :
– ब्रँच ऑफिसर (नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर) – १ पद (बेसिक पे – ६७,७०० रुपये प्रति महिना)
– ब्रँच ऑफिसर (वेब सर्वर अॅडमिनिस्ट्रेटर) – १ पद (बेसिक पे – ६७,७०० रुपये प्रति महिना)
– ब्रँच ऑफिसर (डाटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर) – २ पदे (बेसिक पे – ६७,७०० रुपये प्रति महिना)
– ज्युनिअर कोर्ट असिस्टंट (हार्वेयर मेंटेनन्स) – ३ पदे (बेसिक पे – ३५,४०० रुपये प्रति महिना)
असा करा अर्ज :
सुप्रीम कोर्टमध्ये निघालेल्या या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अॅप्लिकेशन फॉर्म जाहिरातीवेळीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता. या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढावी लागेल. त्यामध्ये दिलेल्या दिशानिर्देशांनुसार फॉर्म भरून तो पुढील पत्त्यावर पाठवावा
६ नोव्हेंबर २०२० पूर्वी तुमचा फॉर्म या पत्त्यावर पोहोचेल, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. या तारखेनंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.