TATA AIA Life Insurance मध्ये 10,000 हून अधिक लोकांना नोकऱ्या मिळणार
TATA AIA Life Insurance Career
Tata AIA Life Insurance, has launched 100 new digital branches to bring distribution facilities across the country. Through the new branch, the company is expanding to more than 18 cities across the country. These include Maharashtra, Gujarat, Rajasthan, Uttar Pradesh and West Bengal. The expansion will also provide jobs to more than 10,000 people
TATA AIA Life Insurance मध्ये 10,000 हून अधिक लोकांना नोकऱ्या मिळणार
टाटा समूहाची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने देशभरात डिट्रिब्युश सुविधा पोहोचवण्यासाठी 100 नवीन डिजिटल शाखा सुरू केल्या आहेत. सध्या, कंपनीच्या देशातील 25 राज्यांमधील 175 शहरांमध्ये 128 पेक्षा जास्त शाखा आहेत. कंपनीने एजन्सी, ब्रोकिंग, बँक विमा, असिस्टेड खरेदी (Assisted Purchase) आणि ऑनलाईन व्यवसायात मजबूत पकड निर्माण केली आहे. नवीन शाखेच्या माध्यमातून कंपनी देशातील 18 हून अधिक शहरांमध्ये आपला विस्तार करत आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
टाटा एआयएच्या 100 नवीन डिजिटल शाखांपैकी 60 हून अधिक शाखांनी काम सुरू केले आहे. नोव्हेंबरअखेर इतर सर्व शाखांमध्ये काम सुरू होणे अपेक्षित आहे. कंपनीने देशात जीवन विम्याला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे विमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. सर्व शाखा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने काम करू शकतील. यामध्ये ग्राहकांना व्हिडिओ कॉलद्वारे शाखा अधिकाऱ्यांशी बोलता येणार आहे.
किओस्कच्या माध्यमातूनही काम करता येणार
ग्राहकांनी डिजिटल शाखेला भेट दिली तर ते सेल्फ सर्व्हिस डिजिटल किओस्कद्वारे (kiosk) त्यांची सर्व कामे करू शकतात. अशा डिजिटल शाखेमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणेही सोपे होईल. TATA AIA Life Insurance चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) म्हणाले की, सध्याच्या युगात ग्राहक त्यांच्या सुरक्षिततेकडे खूप लक्ष देतात. अशा परिस्थितीत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यासाठी आम्ही डिजिटल शाखा सुरू करत आहोत. याद्वारे ग्राहकांच्या वाढत्या गरजा सहज पूर्ण करता येतील.
विमा सल्लागार म्हणून नोकरी मिळेल
TATA AIA Life Insurance चे चीफ एजन्सी ऑफिसर अमित दवे म्हणाले की, 100 पैकी 70 नवीन डिजिटल शाखा अशा ठिकाणी सुरू केल्या जात आहेत जिथे आमच्याकडे अद्याप एजन्सी नाही. यामुळे आमचा आवाका वाढेल आणि स्थानिक लोकांनाही फायदा होईल. या विस्तारात 10,000 हून अधिक लोकांना नोकऱ्याही मिळणार आहेत. कंपनीचे नवीन कर्मचारी विमा सल्लागार म्हणून काम करू शकतील.
[email protected]
hivraj yadav gondia drives 9the pass get it from you and
How To appy
[email protected]
[email protected]