अतिरिक्त शिक्षकांमुळे शिक्षक भरती लांबणीवर
Teacher Recruitment Has Been Delayed Due To Overstaffing In The State
अतिरिक्त शिक्षकांमुळे शिक्षक भरती लांबणीवर
कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार केली असून, कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर या शाळांजवळील शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. मात्र, राज्यात सद्य:स्थितीत तेराशे शिक्षक अतिरिक्त असून, कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील सुमारे दहा हजार शिक्षक नव्याने अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन कसे आणि कुठे करायचे, असा पेच शालेय शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे.
Shikshak Bharti- महाराष्ट्रात शिक्षक भरती अपडेट्स
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात कन्नड माध्यमाचे 17 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. मात्र, या ठिकाणी कन्नड माध्यमातील जागाच रिक्त नसल्याने या शिक्षकांना सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये समायोजित करावे, असे पत्र शिक्षण उपसंचालकांना दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.
जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक
मुंबई (297), दक्षिण मुंबई (124), उत्तर मुंबई (188), ठाणे (93), रायगड (6), पुणे (22), कोल्हापूर (16), सोलापूर (17), सांगली (2), सिंधुदुर्ग (5), जळगाव (12), धुळे (70), नंदुरबार (33), नागपूर (182), चंद्रपूर (53), वर्धा (10), गोंदिया (36), औरंगाबाद (24), जालना (10), बीड (51), लातूर (41), उस्मानाबाद (18), अकोला (15), वाशिम
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचे सुरू आहे नियोजन
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची माहिती संकलित केली असून, संबंधित विषयांच्या जागा रिक्त असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात सुमारे तेराशे शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन सुरू आहे.