Teacher Training- राज्यातील शिक्षकांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण;

Teacher Training 2021

Shikshak Prashikshan:  According to the new education policy 2020, the objective is to provide modern training to the teachers. Maharashtra State Teacher Development Institute has entered into agreements with IISER and IOFC for the training of teachers in the state .

Shikshak Bharti -शिक्षण विभागात दोन हजारहून अधिक पदे रिक्त

राज्यातील शिक्षकांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण;

Teacher Training: राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA)महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC)या संस्थांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत हा करार केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सामजंस्य करार करण्यात आला.

Shikshak Bharti- राज्यात ६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार

  • विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आले पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे असे यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
  • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) या संस्थेच्या सायन्स शिक्षकांच्या माध्यमातून जास्त जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचणे. तसेच राज्यामध्ये सध्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणे.
  • नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे हा या संस्थेचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.
  • यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणेचे रजिस्ट्रार जी. राजा शेखर, राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियानचे सहसंचालक प्रमोद पाटील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), पुणेचे संचालक जयंत उदगावकर, इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडियाचे (IOFC) विश्वस्त किरण गांधी, हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
  • उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यावेळी उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!