टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळणार आता सरकारी नोकरी
tennis ball cricket in reservation for government jobs
Tennis Ball Cricket in Reservation for Government Jobs: Tennis ball cricketers will also now be able to get jobs in government service. The government has approved the game as a reservation for jobs. These players will be appointed to the post of Group “C” in the Ministry of Employment or in the Central Department of the Central Government
टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळणार आता सरकारी नोकरी
भुसावळ : टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकणार आहे. शासनाने नोकरीसाठी या खेळाला आरक्षणात मान्यता दिली आहे. या खेळाडूंची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट “क” पदावर केली जाईल .भरतीसाठी तयार केलेल्या क्रीडा कोटाच्या यादीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ६४ व्या क्रमांकावर जोडले गेले आहे.
- खेळाडूंचा कल – टेनिस बॉल क्रिकेट हा कमी खर्चिक खेळ असून, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या महागड्या किटची आवश्यकता नसते. तसेच टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाने टेनिस बोल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आनंद संचारला आहे.
- टेनिस बॉल क्रिकेट लीगही होणार – पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आता टेनिस बॉल क्रिकेटकडे खेळाडूंची क्रेझ वाढेल, A4ाच बरोब%E आयपीएलच्या धर्ती%Aर लवकरच टेनिस बॉल क्रिकेटची ही लीग होणार असल्याची माहिती टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अभिनव तिवारी, सचिव इम्रान लारी, राज्य संघटनेचे सचिव इंडियन फेडरेशनचे चेअरमन डॉ. एम. बाबर, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल दिली.
सोर्स: लोकमत