डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये रोजगार

Tesla Recruitment 2021

Elon Musk had earlier in July announced that the company’s construction work would begin at a faster pace with new manufacturing facilities. Students do not need a college degree to work with Tesla. Students can apply for a job at this plant after high school. The Tesla manufacturing plant is expected to employ more than 10,000 people by 2022.

 एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा. टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्रीशिवायच टेस्लामध्ये (Tesla) नोकरीची संधी मिळणार आहे.

एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना टेस्लासोबत काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नाही. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.


Tesla Recruitment 2020: Tesla CEO Alan Musk is hiring engineers for its brain-machine interface company Neuralink. Mast did not have an academic background in neuroscience. In particular, he gave this answer in response to a question from Indian youth.

ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी

ब्रेन इंटरफेस विकसित करण्याची कला जर तुमच्या अंगी असेल तर एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक तुमची वाट पाहत आहे…अधिक माहिती जाणून घ्या.

Neuralink Bharti 2020

टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आपल्या ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंकसाठी इंजिनीअर्सची भरती करत आहेत. या कामासाठी न्यूरोसायन्सच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची गरज नाही असं उत्तर मस्त यांनी दिलं. विशेष म्हणजे हे उत्तर त्यांनी एका भारतीय तरुणाच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून दिलं.

प्रणय पाटोळे असं या तरुणाचं नाव आहे. न्यूरालिंकसाठी काम करण्यासाठी न्यूरोसायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग / रोबोटिक्स / बायोलॉजी ची शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे का असा प्रश्न प्रणयने एलन मस्क यांना ट्विटरद्वारे विचारला होता. त्यावर मस्क यांनी उत्तर दिले.

मस्क यांनी उत्तरादाखल ट्विट केलं – ‘जर तुम्ही फोन / व्हेरिएबल्स (सिलिंग, सिग्नल प्रोसेसिंग, इंटक्टिव्ह चार्जिंग, पॉवर एमजीएमटी इत्यादी) च्या कठीण समस्या सोडवल्या असतील तर कृपया न्यूरालिंक इंजिनीअरिंगसोबत काम करण्याच्या पर्यायावर विचार करा.’ प्रणय याला टॅग करत मस्क यांनी थेट असे उत्तर दिले की, ‘न्यूरोसायन्सची पार्श्वभूमी असणे गरजेचे नाही.’

मस्क यांनी यापूर्वी ही घोषणा केली होती की २८ ऑगस्ट रोजी ते न्यूरालिंकमधील प्रगतीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट देतील. अर्धांगवायूने ग्रासलेल्या लोकांसाठी उपकरणे नियंत्रित करण्यासंबंधीचे काम ही कंपनी करते. ज्यांना ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूसंबंधी अन्य विकार आहेत अशा लोकांना सशक्त बनवण्यासाटी मदत करण्यासाठी न्यूलालिंकने मागील वर्षी एका चिपमध्ये मेंदूशी संबंधित थ्रेड्सचे उद्घाटन केले होते. ही चिप दीर्घकाळ चालते. मस्क यांचा न्यूरालिंकबाबतचा हा संवाद रविवारी सुरू होता.

सोर्स:मटा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!