नोकरी गमावलेल्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; बेरोजगार भत्त्यामध्ये केली दुप्पट वाढ

Those who lose their jobs will get half the Salary for Three Months

 कोरोना काळात नोकरी गमावलेल्या नोकरदारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजने’अंतर्गत इएसआयसीने बेरोजगार भत्त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. दोन वर्षे नोकरी करून 24 मार्च ते 30 जून 2021 दरम्यान बेरोजगार झालेल्या कामगारांना ही वाढ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचारी ‘इएसआयसी’मध्ये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे.

 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जे कामगार बेरोजगार झाले त्यांच्यासाठी नियम शिथिल करून ही वाढ देण्यात येत आहे. सुरवातीला 31 डिसेंबर 2020 पर्यंतच ही योजना लागू करण्यात आली होती. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या 25 टक्के भत्ता देण्यात येत होता. आता मात्र तो 50 टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता जास्तीत जास्त 90 दिवसांचा असेल आणि तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर 30 दिवसांनी दिला जाणार आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपला अर्ज www.esic.in या संकेतस्थळावर लॉगइन करून भरावा. त्यानंतर त्याची प्रिंट, आधार कार्ड, पासबुक किंवा चेकच्या प्रतीसह आपल्या जवळच्या ‘इएसआयसी’च्या कार्यालयामध्ये जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार गमावणाऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळते. हा एक प्रकारे बेरोजगारी भत्ता असतो. याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो, ज्याच्या मासिक पगारातून ‘इएसआय’ योगदान कापले जाते.

सोर्स: सकाळ


The Corona crisis has lost millions of workers their jobs. Many have gone home, leaving companies unemployed. The government has given very good news to such industrial workers. These workers will be paid 50 percent of their average three-month salary in the form of Unemployment Benefit.

The central government’s decision will benefit about 40 lakh workers. The government has introduced the scheme for industrial workers who lost their jobs in the Corona crisis by relaxing the rules. For this, three months’ salary will be collected and half of it will be paid. The benefit will go to the same workers whose jobs have gone from March 24 to December 31.

खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार;

कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या 24 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत.

बेरोजगारांसाठी महत्त्वाची बातमी; मोबाईल उद्योग क्षेत्रात होणार सर्वात मोठी रोजगार निर्मिती!

मिंट या वृत्तपत्राने याचे वृत्त दिले आहे. यानुसार हा प्रस्ताव कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) च्या बैठकीत मांडण्यात आला होता. ESIC ही सरकारी संस्था असून ती 21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना ESI स्कीम अंतर्गत विमा पुरविते.

ESIC चे बोर्ड सदस्य अमरजीत कौर यांनी सांगितले की, या पावलामुळे ESIC अंतर्गत विमा संरक्षण असलेल्या योग्य व्यक्तीला त्याचे तीन महिन्यांच्या वेतनाची 50 टक्के रक्कम रोख मदत स्वरुपात दिली जाईल. यासाठी या कामगाराची नोंदणी आणि त्याची नोकरी गेल्याची नोंदणी ESIC कडे व्हायला हवी. यासाठी कामगार ESIC च्या कोणत्याही शाखेत जाऊन नोकरी गेल्याचा अर्ज करू शकणार आहेत. यानंतर ESIC या कामगाराची खरेच नोकरी गेली का ते पडताळून पाहणार आहे. यानंतरच त्याच्या खात्यात ते पैसे पाठविले जातील. यासाठी आधार क्रमांकाची मदत घेतली जाईल.

घरबसल्या नोकऱ्या शोधा; गुगलचं नवं अॅप भारतात लाँच

दरम्यान, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार कोरोना संकटात जवळपास 1.9 कोटी लोकांनी नोकरी गमावलेली आहे. केवळ जुलैमध्ये 50 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. ईपीएफओनुसार 4.98 लाख लोक औपचारिकरित्या पुन्हा कामाला लागले आहेत.

1 Comment
  1. SACHIN says

    IS IT APPLIED FOR NGO JOB LOSS

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!