केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती

UCIL Apprentice Vacancy 2020

UCIL Recruitment 2020: UCIL Recruitment 2020: There is a good chance of getting a central government job. Recruitment is underway for 10th, 12th and Science graduates. There are job opportunities in various positions in Uranium Corporation of India Limited (UCIL). The recruitment process for this recruitment process had been going on for several days. The deadline for applications was July 22, but this deadline has now been extended. Now you can apply till August 10. If you have not yet joined the recruitment process, you still have a chance. We provide official notifications, more information on applications, position information and important links.

केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरू आहे….
UCIL Recruitment 2020: केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. दहावी, बारावी आणि विज्ञान पदवीधरांसाठी भरती सुरू आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी गेले अनेक दिवस अर्ज प्रक्रिया सुरू होती. २२ जुलै पर्यंत अर्जांची अंतिम मुदत होती, पण ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता १० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. जर तुम्ही अद्याप या भरती प्रक्रियेत सामील झाला नसाल तर तुम्हाला अजूनही संधी आहे. अधिकृत नोटिफिकेशन, अर्जांसंबंधी अधिक माहिती, पदांची माहिती आणि महत्त्वाच्या लिंक्स पुढे देत आहोत.
पदांची नावे आणि वेतन

ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल) – ४ पदे – (वेतन – ३३,९९४ प्रति महिना)

माइनिंग मेट ‘सी’ – ५२ पदे – (वेतन – ३३,०८७ प्रति महिना)

बॉयलर कम कॉम्प्रेसर अटेंडंट ‘ए’ – ३ पदे – (वेतन – ३२,१८० प्रति महिना)

वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर ‘बी’ – १४ पदे – (वेतन – ३२,६३३ प्रति महिना)

ब्लास्टर ‘बी’ – ४ पदे – (वेतन – ३२,६३३ प्रति महिना)

अप्रेंटिस (माइनिंग मेट) – ५३ पदे

अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) – ६ पदे

एकूण पदांची संख्या – १३६

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करायला १८ मे २०२० पासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया २२ जुलै २०२० रोजी संपणार होती. मात्र आता या प्रक्रियेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी शुल्क ५०० रुपये आहे. महिला व अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. शुल्क डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.

आवश्यक पात्रता

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. कोणत्या पदासाठी किती पात्रता आवश्यक आहे ते पुढे दिलेल्या नोटिफिकेशनद्वारे कळेल.

निवड प्रक्रिया

रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे (CBT) होणार आहे.

UCIL bharti 2020 साठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!