GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

UGC Exam Timetable 2020 – 2021

UGC Exam Timetable 2020 – 2021

When will the examinations be held in various universities in the country and in the colleges affiliated to the universities? When will the new session start? How will the admission process be completed? The University Grants Commission has published a new academic schedule to answer all these questions.

देशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये परीक्षा कधी घेतल्या जाणार? नवीन सत्र कधी सुरू होईल? प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होईल? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने  नवीन शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.

हे कॅलेंडर मार्गदर्शक तत्त्वे म्हणून जारी केलं गेली आहे. यूजीसीने स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या शिफारशींनुसार आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर हे वेळापत्रक तयार केलं गेलं आहे. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्भवलेली शैक्षणिक परिस्थिती मार्गी लावण्यासाठी काय करता येईल त्यासाठी या मार्गदर्शक सूचना आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांच्या उपस्थितीत हे कॅलेंडर आणि मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जाहीर करण्यात आली.

११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय म्हटले आहे?

ज्या महाविद्यालयांमध्ये इंटरमीडिएट (अकरावी) वार्षिक परीक्षा झालेल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे प्रमोट करण्यात यावे.

कशा होतील परीक्षा?

सर्व टर्मिनल, एन्ड सेमिस्टर उपलब्ध साधनसामुग्रीनुसार ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेता येतील. विद्यापीठे परीक्षेच्या नवीन पद्धती अवलंबू शकतात. परीक्षेचा वेळ तीन तासांवरून कमी करत दोन तासांपर्यंत आणला जाऊ शकतो. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन व्हायलाच हवं. जुलै 2020 मध्ये विद्यापीठे या परीक्षा घेऊ शकतात.

२०१९-२० साठी नवीन कॅलेंडर

 • सेमिस्टरची सुरूवात – १ जानेवारी २०२०
 • वर्ग निलंबित – १६ मार्च २०२०
 • ऑनलाईन वर्ग – १६ मार्च २०२० ते ३१ मे २०२०
 • डेझर्टेशन, प्रकल्प काम, इंटर्नशिप इत्यादी. – १ जून ते १५ जून २०२०
 • उन्हाळी सुट्टी – १६ जून ते ३० जून २०२०
 • टर्मिनल सेमिस्टर / वार्षिक परीक्षा – १ जुलै ते १५ जुलै २०२०
 • इंटरमिजिएट सेमिस्टर / वार्षिक परीक्षा – १५ जुलै ते ३१ जुलै २०२०
 • टर्मिनल सेमिस्टर / वार्षिक निकाल – ३१ जुलै २०२०
 • इंटरमिजिएट सेमिस्टर / वार्षिक निकाल – १४ ऑगस्ट २०२०

२०२०-२१ साठी नवीन कॅलेंडर

 • वर्ग सुरू (द्वितीय व तृतीय वर्षासाठी) – १ ऑगस्ट २०२०
 • प्रथम सत्र / वर्षाची नवीन बॅच सुरू – १ सप्टेंबर २०२०
 • परीक्षा – १ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
 • सेमिस्टरचे वर्ग सुरू – २७ जानेवारी २०२१
 • सेमिस्टर वर्ग समाप्त – २५ मे २०२१
 • परीक्षा – २६ मे २०२१ ते २५ जून २०२१
 • उन्हाळी सुट्टी – १ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१
 • नवीन सत्र – २ ऑगस्ट २०२१ पासून

समितीच्या सूचनेनुसार नवीन प्रवेशासाठी सप्टेंबर २०२० पासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे निर्देश युजीसीने दिले आहेत. जे विद्यार्थी द्वितीय किंवा तृतीय वर्षाचे आहेत, त्यांचे नवीन सत्र ऑगस्ट २०२० पासून सुरू होईल.

एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

यूजीसीने एमफिल आणि पीएचडी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक संघटनेची मागणी लक्षात घेऊन एमफिल व पीएचडी विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. शिवाय या कोर्सेससाठी वायवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावे, असेही यूजीसीचे निर्देश आहेत.

सोर्स: मटा

Leave A Reply

Your email address will not be published.