नोकरीचा अनुभव मिळावा; आता पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप
UGC Guidelines Now Internships To Degree Courses
Internships will now have to be done for the courses as per the guidelines of the University Grants Commission. From now on, the internship will be a part of this course. Students will also be given 20% credit for this. Internships will now be required for BA, BCom, BSc as well as other traditional courses. From now on, the internship will be a part of this course. The University Grants Commission has recently issued guidelines in this regard.
नोकरीचा अनुभव मिळावा; आता पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप
बीए, बीकॉम, बीएस्सी याचबरोबर इतर पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी आता इंटर्नशिप करावी लागणार आहे. यापुढे इंटर्नशीप हा या अभ्यासक्रमाचाच भाग होणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण द्यावे लागते, अशी ओरड उद्योगांकडून होत असते. यामुळे या विद्यार्थ्यांनाही नोकरीचा अनुभव यावा, या उद्देशाने या अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करण्यात येणार आहे. यामुळे या अभ्यासक्रमांमध्येच आता इंटर्नशिपचा समावेश करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या केवळ इंजिनीअरिंग, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. मात्र बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही. नवीन शिक्षण धोरणात याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार विद्यापीठांना अभ्यासक्रमात एक पूर्ण सत्र हे इंटर्नशिपसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर याच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना यासाठी २० टक्के क्रेडिट देण्याच्या सूचनाही यात करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी लाखो विद्यार्थी हे पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे व ते नोकरीस सक्षम व्हावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. यासाठी उद्योागांचे विचारही लक्षात घ्याव्यात, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही इंटर्नशिप कोणत्याही स्थितीत कॉलेज कॅम्पसमध्ये न होता कंपन्यांमध्ये व्हावी, अशी सूचनाही यात केली आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी कपंन्यांशी सामंजस्य करारही करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे. याचे मूल्यमापन करताना कंपनीकडून येणारे मूल्यांकनही विचारात घ्यावे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
इंटर्नशिप का?
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडण्यासोबतच जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचीही माहिती त्यांना मिळावी, या दृष्टीने या बदलत्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. असे असले तरी पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडला तरी तो नोकरी करण्यास उपयुक्त नसतो असे उद्योगांचे म्हणणे आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रशिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने अभ्यासक्रमात ही सुधारणा केली आहे.
विद्यार्थ्यांसमोर आव्हान
राज्यातील एका विद्यापीठात दरवर्षी अंदाजे तीन ते चार लाख विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करतात. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना इंटरर्नशिप कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यामुळे याबबातही विद्यापीठांना स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.