विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात
University Exam 2021
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात
University Exam 2021: Higher Education Institutions in Maharashtra will conduct the Winter 2020 examinations, which are likely to be held in March 2021
कोरोना संकट काळात विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पर्याय स्वीकारून घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावा, असा सूर शिक्षण विभागातून उमटत आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्रात, उच्च शिक्षणातील संस्थांनी, उन्हाळी २०२० च्या परीक्षा बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. त्या परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे योग्य होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे व त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लस पण अवघ्या काही दिवसात उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रात उच्च शैक्षणिक संस्थांनी हिवाळी २०२० च्या परीक्षा, ज्या मार्च २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहेत, त्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे योग्य ठरेल, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तर पदवीचे अवमूल्यन
मागील ऑनलाइन पद्धतीत, बहुतांशी, परीक्षार्थींचे परीक्षा सोडवतांना निरीक्षण, देखरेख करण्यात आले नव्हते. त्यामुळे परीक्षार्थी काही गैरमार्गाने परीक्षा सोडवत आहे का, याबद्दल शंका निर्माण व्हायला वाव राहतो. निरीक्षण किंवा देखरेखी शिवाय परीक्षा घेण्याचे समर्थन निश्चितपणे कोणी करणार नाही. परीक्षार्थींनी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिल्यास त्याला गैर मार्गाचा अवलंब करण्याची संधी न देण्याची योजना ऑनलाइन पद्धतीत आणण्याची जरूरी आहे. अन्यथा अश्याने पदवीचेच अवमूल्यन होईल.
ऑनलाईन परीक्षांचे निरीक्षण होत नसल्याने गैरमार्गाचा वापर करून पेपर सोडवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घ्यावी किंवा अगदीच पर्याय नसेल तर ऑनलाइन परीक्षा घेताना निरक्षणाची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
विद्यापीठांच्या परीक्षा १५ मे पर्यंत नाहीच?
In the wake of the situation caused by the coroner, the Governor and Chancellor Bhagat Singh Koshari discussed various issues with the Vice Chancellor of all the universities in the state on Tuesday. In the present situation, the Governor advised the Vice-Chancellor that there should be no academic loss to the students and they should try to take the summer of the universities in a shared way. Higher Education Minister Uday Samant also participated in the meeting through a video conference. Sources indicate that the examination for universities will not be held till May 15 at this time.
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठांच्या परीक्षा १५ मेपर्यंत होणार नसल्याचे संकेत देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क व सॅनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. व्हर्च्युअल क्लासरूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरात स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रित लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग सरकारला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई