हुशार अन् गरजू विद्यार्थिनींसाठी आरोग्‍य विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती; 

University Of Health Provides Scholarship

 हुशार अन् रजु विद्यार्थिनींसाठी आरोग्‍य विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती;

नाशिक : हुशार व गरजू विद्यार्थिनींकरीता महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना उपलब्‍ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता विद्यापीठाशी संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व नियमित शिक्षण घेणार्या व मागील वर्षात उत्तीर्ण झालेलया नियमित पदवी आणि पदव्‍युत्तर शिक्षण घणार्या विद्यार्थिनींना विद्यापीठातर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाईल. त्‍याकरीता पात्र विद्यार्थिनींनी महाविद्यालयाकडे प्रस्‍ताव सादर करायचे असून, पडताळणीनंतर हे प्रस्‍ताव महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे पाठवायचे आहेत. या प्रक्रियेकरीता ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदत असल्‍याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. 

 ..तर प्रस्‍ताव अपात्र ठरविण्यात येतील 

 आरोग्‍य विद्यापीठामार्फत विद्यार्थिनींकरीता असलेल्‍या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेकरीता विद्यापीठामार्फत अर्ज मागविले आहेत. संबंधित महाविद्यालयांतील प्राचार्य, अधिष्ठातांनी प्रस्‍ताव विद्यापीठास पाठविण्यापूर्वी प्रस्‍तावाची छाननी करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. केंद्र, राज्‍य शासनाच्‍या किंवा अन्‍य संस्‍थांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप शुल्‍क परतावा शुल्‍क सवलत किंवा अन्‍य अनुदान मिळत असलेल्‍या विद्यार्थिनींचे प्रस्‍ताव अपात्र ठरविण्यात येतील. विद्यार्थिनींनी महाविद्यालयामार्फत विद्यापीठास ३० सप्‍टेंबरपर्यंत प्रस्‍ताव सादर करायचे आहेत. या मुदतीतच प्राप्त अहवाल कव्‍हरींग लेटरसह प्राचार्य, अधिष्ठातांनी विद्यापीठाकडे पाठवायचे आहेत, असे विद्यापीठातर्फे जारी परीपत्रकात म्‍हटले आहे.

 शिष्यवृत्तीसाठी ही आहे अट 

 विद्यार्थिनींच्‍या पालकांचे लगतच्‍या आर्थिक वर्षातील कमाल वार्षिक उत्‍पन्न सहा लाख किंवा त्‍यापेक्षा कमी असेल, अशा विद्यार्थिनी योजनेस पात्र असतील. सर्वात कमी उत्‍पन्न असलेल्‍या पालकांच्‍या विद्यार्थिनींना प्राधान्‍य देण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत. आवेदनकर्त्या;विद्यार्थिनीस पंचवीस हजार रूपये कमाल मर्यादेत अनुदान वाटप केले जाईल.

  असे असेल प्रमाण

आंतरवासियता प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी, अनिवासी भारतीय किंवा परराज्‍यातून आलेल्‍या विद्यार्थिनी, व्‍यवस्‍थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहेत. पदवी अभ्यासक्रमास शंभरपर्यंत प्रवेश क्षमता असलेल्‍या संलग्‍नीत महाविद्यालयाकडून तीन विद्यार्थिनी, १०१ ते १५० प्रवेश क्षमता असलेल्‍या महाविद्यालयातून चार विद्यार्थिनी, १५१ ते दोनशे प्रवेश क्षमता असलेल्‍या महाविद्यालयांतून पाच विद्यार्थिनींचे प्रस्‍ताव पाठविता येतील. पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित एका संलग्‍नीत महाविद्यालयातून केवळ एक विद्यार्थिनीचा प्रस्‍ताव सादर करायचा आहे.</p>

Comments are closed.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!