ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? मग तुमच्यासाठी ‘या’ काही खास टिप्स!

Use These Tips If You Are Giving Virtual Job Interview During Lockdown

ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? मग तुमच्यासाठी ‘या’ काही खास टिप्स!

अनेक क्षेत्र ऑनलाइन झाली असली तरीही व्हर्च्युअल मुलाखती देण्याचा अनुभव फारच कमी जणांना असतो. अशा वेळी गोंधळून जायला होतं. आत्मविश्वास न गमवता व्हर्च्युअल मुलाखतीला सामोरं कसं जाता येईल याच्या टिप्स…

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सध्या अनेक कंपन्यांनी ऑनलाइन मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक क्षेत्र ऑनलाइन होत असतानाच नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा व्हर्च्युअली घेण्यात येत आहेत. व्हर्च्युअल मुलाखतींचा अनुभव नसल्यामुळे या मुलाखती देताना काहीसा गोंधळ उडू शकतो. अशा वेळी गोंधळून न जाता व्हर्च्युअल मुलाखतींना यशस्वीरित्या कसं सामोरं जाता येईल याच्या काही टिप्स जाणून घेऊ या…

पाया असू द्या पक्का

कोणत्याही मुलाखतीला सामोरं जाण्यापूर्वी काही प्राथमिक गोष्टी पक्क्या करणं आवश्यक असतं. पाया पक्का असला तर पुढील सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडण्यास मदत होते. पाया पक्का करण्यासाठी कंपनीची माहिती, कंपनीसंबंधीत विविध बातम्या, तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेले ऑनलाइन रिव्ह्यूज यासारख्या गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही संबंधित कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी का इच्छुक आहात हेसुद्धा सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींसोबतच तुमचा सीव्ही योग्य आणि अपटूडेट आहे की नाही याची खात्री करून घ्या.

निवडा योग्य जागा

ऑनलाइन मुलाखतीला सामोरं जाताना योग्य जागा निवडणं गरजेचं आहे. जागा निवडताना प्रकाश आणि बॅकग्राऊंड या गोष्टींची योग्य निवड करणं आवश्यक असतं. मुलाखत देण्यासाठी बॅकग्राऊंड स्वच्छ असलेली जागा निवडा. बॅकग्राऊंड मुलाखतकाराचं (मुलाखत घेणाऱ्यांचं) लक्ष विचलित करणारी नसेल याची दक्षता घ्या. मुलाखत देताना कॅमेरा तुमच्या समोर असू द्या. योग्य, प्रोफेशनल आणि आत्मविश्वास वाढेल असा पेहराव करा. मुलाखत देताना लक्ष विचलित होईल असं वाटत असेल तर खोलीचा दरवाजा बंद ठेवा. जेणेकरून, तुम्ही पूर्णपणे मुलाखतीवर लक्ष केंद्रित करू शकाल.

सामना तांत्रिक अडचणींचा

मुलाखत देताना तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलाखत देण्यापूर्वी तुमच्या घरातील वायफाय योग्य प्रकारे सुरू आहे का आणि त्याचा स्पीड योग्य आहे याची खात्री करून घ्या. तुमचा लॅपटॉप पूर्णपणे चार्ज करून घ्या. मुलाखत देताना फोन तुमच्या जवळच ठेवा. फोन जवळ ठेवण्यापूर्वी तो ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर असेल याची खात्री करा. जेणेकरून काही तांत्रिक अडथळा आलाच तर मुलाखत घेणाऱ्या किंवा मुलाखतीसंबंधित व्यक्तींशी संपर्क साधता येईल.

सराव करा

व्हर्च्युअल मुलाखत देताना मुलाखतकारांचे प्रश्न नीट ऐका आणि घाई न करता त्यांची योग्य उत्तरं द्या. मुलाखत देताना ताठ बसा. प्रत्यक्ष मुलाखत देण्यापूर्वी तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत व्हर्च्युअल मुलाखतीचा सराव करून पाहा. जेणेकरून, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मुख्य मुलाखतीच्या वेळी गोंधळ उडणार नाही. मुलाखत झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला आभार मानणारा मेल पाठवा.

आत्मविश्वास गमावू नका

मुलाखतीदरम्यान तुमच्याकडून अनावधानाने काही चुका झाल्या असतील किंवा ‘हा मुद्दा आणखीन प्रभावीपणे मांडता आला असता’ असं वाटल्यास त्या सर्व गोष्टी लिहून ठेवा. त्या गोष्टी पुढील मुलाखत देताना लक्षात असू द्या. तुम्ही घरूनच मुलाखत देत असल्यामुळे काही समस्या येणं स्वाभाविक आहे. याची मुलाखतकारांनासुद्धा कल्पना असते. त्यामुळे अडथळा आल्यास घाबरून जाऊ नका.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Dinesh T paik says

    Dinesh T paik

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!