वैधमापन कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

Vacancies in the Validation Office

The work of evaluating and renewing the weights in the district is being done through this office. In particular, only 15 posts have been sanctioned in this office which covers Parbhani and Hingoli districts. 5 posts of staff are vacant in the validation office.

 वैधमापन कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

 जिल्ह्यातील वजनमापांचे मूल्यांकन करणे तसेच नूतनीकरण करण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केेले जात आहे. विशेष म्हणजे, परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयात केवळ १५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सहायक नियंत्रक भूमापक १, निरीक्षक ४, क्षेत्रीय सहायक ४, शिपाई ५ आणि लिपिकाचे एक पद मंजूर आहे. प्रत्यक्षात निरीक्षकाची २, क्षेत्रीय सहाय्यकाची ३ अशी ५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने या कार्यालयासाठी वाढीव पदे मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!