Yavatmal ITI Job Fair 2023-यवतमाळ येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
Yavatmal ITI Job Fair 2023
Yavatmal ITI Job Fair 2023: A National Apprenticeship Recruitment Fair has been organized at Government Industrial Training Institute Yavatmal on January 9 at 9:30 am. Trainees must bring xerox copies of original documents
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 9 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुझुकी मोटार गुजरात प्रायव्हेट लिमिटेड, हंसलपुर गुजरात या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
लेखी परीक्षा व मुलाखत घेवून शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी (Recruitment Fair) 18 ते 24 या वयोगटातील जास्तीत जास्त आयटीआय वेल्डर, फिटर, पेंटर जनरल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, टर्नर, टुल्स अँड डाय मेकर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, मेकॅनिक डिझेल उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान 16 हजार 900 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नागोरे यांनी केले आहे.
Comments are closed.