राज्यातील तरुणांना मिळणार नौकानयनाचे प्रशिक्षण- जाणून घ्या 

Young People Will Get Sailing Training By Maritime Board

Training By Maritime Board: New initiatives are being implemented by the Maharashtra Maritime Board for the growth of the shipping sector in the State of Maharashtra. As part of these various initiatives, the Board has entered into a Memorandum of Understanding with the first Maritime University in the country. As per the agreement, about 7,000 youths deployed on inland vessels in the state will get training in sailing, said Ports Development Minister Aslam Sheikh.

राज्यातील तरुणांना मिळणार नौकानयनाचे प्रशिक्षण- जाणून घ्या

महाराष्ट्र राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने नवीन-नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या विविध उपक्रमांचा भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत (Maharashtra Maritime Board) मंडळाने सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे 7 हजार तरुणांना नौकानयन विषयक प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

महाराष्ट्र सागरी (मेरीटाईम बोर्ड) च्या नवीन करारामुळे नौकानयन क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे राज्यातील सागरी उपक्रमांना नक्कीच चालना मिळणार आहे. सुमारे सहा ते सात हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा उपयोग राज्यातील सागरी नौकानयन क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!