ZP Nashik Bharti 2023

ZP Nashik Recruitment 2023 Details, Vacancy, Pay Scale.

ZP Nashik Bharti 2023 : Arogya Vibhag Zilha Parishad Nashik has issued the notification for the recruitment of “Psychiatric Medical Officer” Posts. There are total 06 vacancies available for this posts in ZP Nashik Bharti 2023. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 10th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” मानसेवी वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

ZP Nashik Notification 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Here we give the complete details of Jilha Parishad Nashik Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

ZP Nashik Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Arogya Vibhag Zilha Parishad Nashik
🔢Number of Vacancies :  06 Posts
👉Name of Post :  Psychiatric Medical Officer
🌐Job Location :  Nashik, Maharashtra
💰Pay-Scale Rs. 40,000/-
🔗Application Mode :  Offline
🎯Age Criteria : 

ZP Nashik Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1.  Psychiatric Medical Officer 06 Posts

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

 •  For Psychiatric Medical Officer
BAMS

How to Apply for Arogya Vibhag ZP Nashik Recruitment 2023

 • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  The prescribed application form is attached with below given PDF.
  Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  Application Address: आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक 

⏰ All Important Dates of ZP Nashik Vacancy 2023

⏰ Last date to apply :
10th March 2023

Important Link of ZP Nashik Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 

 

 


 

Zilha Parishad Nashik Bharti 2023

ZP Nashik Bharti 2023 for 907 posts – The Rural Development Department has given the final approval for the recruitment of 907 posts in the Nashik Zilla Parishad and it is expected that the recruitment process will start from the month of March 2023. ZP Nashik has been approved to fill up 907 posts and 24 cadre posts are to be filled including Health Department. Among them, the most posts are about three and a half hundred posts of health department in essential services. ZP Recruitment process will be complete by August 2023. There has been no recruitment of employees in Nashik Zilla Parishad for the last many years, in fact, considering the number of employees who retire every year, almost 40% of the posts are vacant compared to the sanctioned number of posts in Zilla Parishad. Therefore, daily work is being done by assigning additional work load to the same employees. Read the more details below and keep visit us for the further updates follow us on Telegram Channel

नाशिक जिल्हा परिषदेत ९०७ रिक्त पदांची भरती; मार्चमध्ये प्रक्रिया सुरु

ग्रामविकास विभागाने नाशिक जिल्हा परिषदेतील ९०७ पदांवर कर्मचारी भरती करण्यास हिरवा कंदील दर्शविला असून, मार्च महिन्यापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य शासनाच्या आदेशान्वये आयबीपीएस या कंपनीशी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने संवाद साधला आहे. साधारणतः ऑगस्टपर्यंत ही भरती पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही किंबहुना दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्येच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे आहे त्याच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार सोपवून दैनंदिन कामकाज केले जात आहे.

ZP Nashik Recruitment 2023 Vacancy updates

 • नाशिक जिल्हा परिषदेला ९०७ पदे भरण्यास मान्यता – राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेत, त्याबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून मंजूर पदे रिक्त पदांची माहिती मागविली होती. एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे सरळ सेवेने भरण्यास संमती दिली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेला ९०७ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून, आरोग्य विभागासह २४ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक पदे अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागाचे सुमारे साडेतीनशे पदे आहेत.
 • शासनाने या भरतीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काढून घेत भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आयबीपीएस, टीसीएस या संस्थांमार्फत भरती करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने या दोन्ही संस्थांशी संपर्क केला असता टीसीएस या सस्थेने नकार कळविला आहे, तर आयबीपीएस या संस्थेने होकार दर्शविला असून लवकरच तसा करार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 • पहिल्यांदाच होणार मेगा भरती -जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचायांची भरती होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय भरतीवर बंदी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुमारे ९०० पदांच्या भरतीसाठी नऊ ते दहा लाख उमेदवारांकडून अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी भरतीची परीक्षा न होता ती टप्प्याटप्प्याने राबविली जाईल.

ZP Nashik Bharti 2023 Updates is given here.  According to the decision taken by the state government on Tuesday (15th), the way for the ZP Nashik Recruitment has been cleared as the recruitment is to be done by the District Selection Board. There are currently 2,726 vacancies in Nashik Zilla Parishad. Out of that 2,538 seats belong to Group C. There is a possibility of recruitment for these posts within a few days. Read the More details given below and keep visit us for the further updates

ZP Bharti 2023 -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा- लवकरच मोठी नोकरभरती

 1. सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने मंगळवारी (दि.15) घेतलेल्या शासन निर्णयाने पदभरती ही जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयानुसार 31 मेपर्यंत रिक्त जागांबाबत आढावा, जाहिरात, परीक्षा आणि निकाल घोषित करून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात याव्यात, असे म्हटले आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रमच जाहीर करण्यात आलेला आहे.
 2. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये 2, 538 जागा या वर्ग 3 च्या आहेत. या जागांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे.
 3.  राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
 4.  याबाबत 31 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयदेखील पारीत करण्यात आला होता. त्यानंतर या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

ZP Nashik Bharti 2023- There are 2,726 vacancies in Nashik Zilla Parishad. In this, 2 thousand 538 seats belong to class-3 and 188 seats belong to class-4. In the anniversary year of independence, the government is going to fill about 75 thousand direct service quota posts in the state. By filling up 2,726 vacancies in the Zilla Parishad, the work load will be lightened. Read More details are given below.

 • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा ( Recruitment ) निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad Nashik )सरळसेवेची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही पदभरती झाल्यास जिल्हा परिषदेतील 2,726 रिक्त जागा भरल्या जाऊन कामाचा भार हलका होईल, अशी भावना कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे.
 • जिल्हा परिषद प्रशासनाने सरळसेवा कोट्यामधील रिक्त पदांचा अंतिम आराखडा राज्य शासनाला कळवलेला असून येत्या काळात होणार्‍या भरतीत याचादेखील समावेश होईल, अशे शक्यता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2 हजार 538 जागा या वर्ग-3 च्या असून 188 जागा या वर्ग- 4 च्या आहेत.
 • राज्य शासनाकडून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दि. 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र आता सर्व काही सुरळीत झाले आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहेत. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य व्हावे यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
 • याबाबत 31 ऑक्टोबरला शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम केलेल्या विभाग कार्यालयांना सरळसेवेच्या कोट्यतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास, तर सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभाग, कार्यालयांना गट अ, ब, क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 80 टक्क्यांपर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली. मात्र ,या निर्बंधातील शिथिलता केवळ 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

456 उमेदवारांना आज नियुक्ती पत्रे

 • नाशिक विभागात राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या आस्थापनांमध्ये निवड होऊन पात्र ठरलेल्या एकूण 456 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपातजिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांंच्या हस्ते आज गुरुवारी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. या उमेदवारांची निवड 2019 ते 2021 या कालावधीत झाली होती. तथापि, करोना कालावधीमुळे या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देता आली नव्हती. नियुक्त झालेल्या उमेदवारांत महावितरण कंपनी आणि वीज निर्मिती कंपनीचे एकूण 182 पात्र उमेदवार आहेत. त्यात गट ‘क’ची भांडारपाल, निम्नस्तर लिपिक, गट ड ची विद्युत सहायक, शिपाई पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महांमडळाचे एकूण 267 पात्र उमेदवार असून यामध्ये गट क ची लेखाधिकारी, वाहनचालक, वाहतूक निरीक्षक पदांचा समावेश आहे. मनमाड नगरपालिकेचे 6 तर सिन्नर नगरपालिकेचा 1 असे एकूण 456 पात्र उमेदवार आहेत.

ZP Nashik Bharti 2023: In Nandgaon taluka of Nashik district, there are total 152 vacancies in education department including headmaster, extension officer, center head, teacher. The result of this post recruitment in 2017 is out but the interviews are pending. Read More details are given below. Stay connected with us to know more about ZP Nashik Bharti 2022

  नांदगाव तालुक्यात शिक्ष‌ण विभागात 152 जागा रिक्त

 • नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांच्यासह शिक्षण विभागातील एकूण १५२ जागा रिक्त असून, या रिक्त जागांमुळे पर्यवेक्षणाच्या तसेच संनियंत्रणाच्या‌ कामात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.
 • विज्ञान, सामाजिकशास्त्र, भाषा विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थांचादेखील अध्ययनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 • राज्यात २०१७ मध्ये झालेल्या गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परंतु, मुलाखती प्रलंबित आहेत.
 • शिक्षण विभागातील एवढ्या जागा रिक्त असताना पुढील कार्यवाही का होत नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शिक्षण विभागातील रिक्त जागांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालत रिक्त जागांवरील नियुक्त्या लवकरात लवकर भरण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

ZP Nashik Bharti 2023- There are 3046 thousand vacancies in B, C and D group in Zilla Parishad. Zilla Parishad staff recruitment process has not been implemented for many years.. Due to this, the number of vacancies in Zilla Parishad is increasing due to the number of employees retiring every year. In Nashik Zilla Parishad, 19266 posts in B, C and D categories have been sanctioned. Most of the staff come from Health, Women and Child Development and Gram Panchayat departments. Read More details regarding ZP Nashik Bharti 2022 are given below.

नाशिक जिल्हा परिषदेत 3046 पदे रिक्त

जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी काम करीत असल्याचे चित्र आहे.

 • नाशिक जिल्हा परिषदेत ब, क व ड संवर्गातील 19266 पदे मंजूर आहेत. यात सर्वाधिक कर्मचारी आरोग्य, महिला बालविकास व ग्रामपंचायत विभागात येतात. हे तीनही विभाग संवेदनशील असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरवण्याचे काम करतात.
 • मात्र, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून राबवली गेली नाही. यामुळे दरवर्षी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमुळे जिल्हा परिषदेतील रिक्तपदांची संख्या वाढतच आहे.
 • मागील तीन वर्षांपासून आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेसाठी अर्ज मागवूनही अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. तशीच अवस्था इतर विभागांचीही आहे. मात्र, राज्य सरकारकडून भरतीप्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे रिक्त जागांच्या आकड्यात दरवर्षी भर पडत आहे.
 • यावर्षी 31 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेतील मंजूर 19266 पदांपैकी केवल 16220 कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे 3046 कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये कमी कर्मचार्‍यांच्या भरवशावर कामकाज चालवावे लागत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या सेवेवर होत आहे.
 • जिल्हा परिषदेतील या रिक्तपदांच्या मोठ्या संख्येमुळे मागील तीन वर्षे जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया राबवली नाही. मागील वर्षी केवळ 10 टक्के बदली प्रक्रियेस मान्यता देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने बदली प्रक्रिया राबवण्यास टाळाटाळ केली होती.
 • पेसा कायद्यामुळे नियमित बदली प्रक्रिया राबवताना पेसा क्षेत्रातील 100 टक्के मंजूर पदांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. यामुळे आधीच रिक्तपदे व त्यात बदल्यांमुळे त्यात भर पडणार असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन बदली प्रक्रिया टाळण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Suvarna says

  Hi

 2. Admin says

  Zilha Parishad Nashik Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!