GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

ZP Pune Rojgar Melava 

ZP Pune MGNREGA

जिल्ह्यात मागेल त्याला रोजगार

ZP Pune Rojgar Melava

Zilla Parishad president Nirmala Pansare made the announcement on Thursday. As a result, even if there is no job card of the Employment Guarantee Scheme during this campaign period, employment guarantee work can be done.

NREGA Bharti 2020

Employment in the hands of many laborers in the district has been deprived due to lockdown. This has led to rising unemployment. The Zilla Parishad has decided to provide employment to such unemployed through the Employment Guarantee Scheme. For this, NREGA special employment campaign will be implemented in the district for the next three months.

नरेगा विशेष रोजगार अभियान

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी गुरुवारी (ता. 28) याबाबतची घोषणा केली. यामुळे या अभियान कालावधीत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड नसले तरी रोजगार हमीचे काम करता येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक मजुरांच्या हातातील रोजगार लॉकडाउनमुळे हिरावला गेला आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा बेरोजगारांना रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पुढील तीन महिने जिल्ह्यात मनरेगा विशेष रोजगार अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मागेल त्याला रोजगार दिला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी गुरुवारी (ता. 28) याबाबतची घोषणा केली. यामुळे या अभियान कालावधीत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड नसले तरी रोजगार हमीचे काम करता येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागातील बहुतांश आर्थिक व्यवस्था ठप्प झालेली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. अशातच एरवी पुणे, मुंबईसारख्या शहरात रोजगारासाठी जाणारे लाखो ग्रामस्थ पुन्हा आपापल्या मूळ गावी परतत आहेत. परिणामी ग्रामीण भागात बेरोजगार ग्रामस्थांची संख्या वाढली आहे.

या सर्व परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बेरोजगारांच्या हाताला रोजगार हमी योजनेतून वेळेत काम उपलब्ध झाले तर, त्यांचा रोजगाराचा प्रश्न किमान काही दिवस तरी सुटू शकेल, अशी अपेक्षाही अध्यक्षा पानसरे यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या मनरेगा विशेष रोजगार अभियानामुळे बेरोजगारांना पर्यायाने गावागावांनाही त्याचा फायदा होईल, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्हा परिषदेने हे तीन महिन्यांचे विशेष रोजगार अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगाराची तातडीने गरज असलेल्या ग्रामस्थांनी आपापल्या गावात राहूनच मनरेगाच्या माध्यमातून काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे..

घरबसल्या करा रोजगाराची मागणी

या रोजगार योजनेतून काम करण्यासाठी इच्छुकांनी रोजगाराची मागणी करणे आवश्यक आहे. ही मागणी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार इच्छुकांना गुगल लिंकच्या माध्यमातून मागणी नोंदवता येणार आहे. यासाठी पुढील लिंकवर जाऊन माहिती भरणे आवश्यक आहे.

Registration Link

सोर्स: सकाळ

1 Comment
  1. प्रफुल्ल says

    भंडारा जिल्हा परिषद चा नाव नाही ahe

Leave A Reply

Your email address will not be published.