कृषी विभागातील गट-अ ते गट-ड संवर्गातील रिक्त पदे लवकर भरणार
Krushi Vibhag Bharti 2021
A total of 27 thousand 502 posts from group-A to group-D have been sanctioned for agriculture department in the state out of which 18 thousand 622 posts have been filled and 8 thousand 880 posts are vacant. Of these, 20 thousand 181 posts of technical category have been sanctioned out of which 14 thousand 809 posts have been filled and 5 thousand 372 posts are vacant.
राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502 पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20 हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5 हजार 372 पदे रिक्त आहेत.
16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के पद भरतीस मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.
Agriculture Department Bharti 2020
राज्यात कृषी खात्याची आठ हजारांहून अधिक पदे रिक्त
कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा प्रत्येक राज्य सरकार करीत असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्याबाबत मात्र त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७९० पदे रिक्त आहेत.
Krushi Vibhag Bharti 2020
राज्यात कृषी खात्यात एकूण मंजूर पदांची संख्या २७,४५३ असून जुलै २०१९ पर्यंत एकूण ८,७०९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नतीने भरावयाची १,७७७ (२७ टक्के), तर नामनिर्देशाद्वारे भरावयाची ६,९३२ (३३ टक्के) पदांचा समावेश आहे.
कृषी पर्यटन क्षेत्राशी संबंधित 10 लाख लोकांना रोजगार
ही स्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. वर्ग -२ तांत्रिक अधिकाऱ्यांची सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे नामनिर्देशाने भरण्यात आलेली नाहीत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कृषीपदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांना नोक ऱ्यांची संधी उपलब्ध नाही. पदोन्नतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.
राज्यात कृषी विभागात आठ हजारांहून अधिक पदे रिक्त
रिक्तपदांमुळे कृषी खात्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. लिपिक वर्गाची ४० टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा फटका प्रशासकीय कामांना बसला आहे. रिक्तपदे तातडीने भरण्यासंदर्भात वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ, पुणेचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांनी सांगितले.
विभाग- रिक्तपदे
आयुक्तालय- ४२७
अमरावती विभाग- ९,२६२
नागपूर विभाग-१,४४७
पुणे विभाग -११८
कोल्हापूर- ८६३
ठाणे विभाग- १,१२२
नाशिक विभाग- ५९७
औरंगाबाद विभाग- ६३७
लातूर विभाग-८०६
रिक्तपदे भरली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. सरकारने याची दखल घ्यावी.
सोर्स: लोकसत्ता
Form kadhi chalu honar ahe
Job