सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ‘हेल्थ सेंटर’ आशा फॅसिलिटेटरचे बळ – Asha Sevika Bharti 2024

Mumbai Mahangarpalika Asha Sevak Bharti 2024 for 5575 posts

Asha Sevika Bharti 2024 – In a review meeting held with the municipal commissioner in March, it was directed to appoint facilitation community mobilizers ASHA facilitators and bureau group organizers on contractual basis to control and evaluate the work of women health volunteers and ASHA workers. Asha Swayamsevika Bharti 2024 complete details are are given below Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
Asha Swayamsevak Responsibilities – Women health volunteers, ASHA workers are greatly helped by facility community mobilizers ASHA facilitators to provide health information and services. Raising various health programmes and child health awareness among the people, assisting in the distribution of resources and services These ASHA workers are of great help in organizing meetings to facilitate and strengthen community participation. They also have to carry out responsibilities such as self-reliance and sustainable programmes, controlling and evaluating the work of women health volunteers and ASHAs, women health volunteers (helping ASHAs in various health-related work training, etc.).

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ‘हेल्थ सेंटर’ आशा फॅसिलिटेटरचे बळ

पावसाळ्यामध्ये उद्‌भवणारे विविध आजार लक्षात घेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाने हेल्थ सेंटरला बळकटी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सुविधा कम्युनिटी मोबिलायझर कम आशा फॅसिलिटेटर भरण्यात येणार आहेत. कंत्राटी तत्त्वावर ही भरती केली जात असून यासाठीची निविदाप्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या २१५ आरोग्य केंद्राकरीता १०६, सुविधा कम्युनिटी मोबिलायझर कम आशा फॅसिलिटेटर कार्यालयाकरिता ब्युरो समूह संघटकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली जात आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ही भरती केली जात आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • महापालिकेकडून वस्तीपातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व निमवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत पुरविली जाते. त्याकरिता विविध आरोग्य केंद्रात आशा सेविका व महिला आरोग्य स्वयंसेविका या कार्यरत आहेत. आशा सेविका य महिला आरोग्य स्वयंसेविका गृहभेटीद्वारे गरोदर माता, लहान बालके यांना समुपदेशन व उपचार घेण्यास प्रवृत्त करतात. महापालिका प्रशासनाने आशा सेविका यांची नियुक्ती करण्याकरिता यापूर्वीच मंजुरी प्राप्त केली आहे. आता या आशांची नियुक्तीप्रक्रिया विभागस्तरावर राबविण्यात येत आहे.
  • मार्चमध्ये आढावा बैठक – पालिका आयुक्तांच्या समवेत मार्च महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत महिला आरोग्य स्वयंसेविका व आशा सेविका यांच्या कामाचे नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी सुविधा कम्युनिटी मोबिलायझर कम आशा फॅसिलिटेटर व ब्युरो समूह संघटक यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासाठी निर्देश दिले होते.
  • या असणार जबाबदाऱ्या – महिला आरोग्य स्वयंसेविका, आशा सेविका यांना आरोग्यविषयक माहिती आणि सेवा देण्याकरिता सुविधा कम्युनिटी मोबिलायझर कम आशा फॅसिलिटेटर यांच्या माध्यमातून मोठी मदत होते. लोकांमध्ये विविध आरोग्यविषयक कार्यक्रम आणि बालआरोग्य जागरुकता वाढवणे, संसाधने आणि सेवांच्या वितरणात मदत करणे समुदायाचा सहभाग सुलभ आणि बळकटीकरण करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यासाठी या आशा सेविकांची मोठी मदत होते. तसेच आत्मनिर्भरता आणि शाश्वत कार्यक्रम, महिला आरोग्य स्वयंसेविका व आशांच्या कामाचे नियंत्रण आणि कामाचे मूल्यमापन करणे, महिला आरोग्य स्वयंसेविका (आशा यांचे विविध आरोग्यविषयक कामाचे प्रशिक्षण करणे आदी कामे करण्यास मदत करणे), अशा जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात.

Asha Sevika Bharti 2024 :- Various health programmes are implemented through volunteers (Asha Sevika) in Nagpur district. Also, various types of information are filled and updated from time to time through the software. However, Asha volunteers were facing problems due to lack of smart mobile phones. Under the initiative of Zilla Parishad Vice President Kunda Raut, a fund of Rs 1 crore 90 lakh 98 thousand has been made available from the District Mineral Fund. Smart phones will be made available to 1910 ASHA volunteers from this fund. Candidates Read the complete details given below on this page regarding the Asha Sevika Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The process of purchase of mobile phones will be done through the government’s Gems portal. Soon, all 1910 Asha Sevika in the district will have new Android mobiles available. We are confident that ASHA volunteers will contribute to providing health services in the district more efficiently,” said Kunda Raut, vice-president of zilla parishad.

आशा वर्कर्सना लवकरच अॅण्ड्रॉईड मोबाईल

जि. प. उपाध्यक्षा राऊत यांचा पुढाकार

नागपूर  जिल्ह्यातील स्वयंसेविकांच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक कार्यक्रम राबविले जातात. तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती वेळोवेळी भरणे, अद्ययावत करणे आदी कामे केली जातात. मात्र, स्मार्ट मोबाईल नसल्याने आशा स्वयंसेविकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या पुढाकारातून जिल्हा खनिज निधीतून १ कोटी ९० लाख ९८ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून १९१० आशा स्वयंसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आता तर लसीकरणाची माहितीही अॅपवर टाकली जाते. शासनाकडून वेळोवेळी सांगितलेली कामे स्वयंसेविकांमार्फत केली जातात. परंतु अनेक आशा स्वयंसेविकांकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल नसल्याने माहिती ॲपवर टाकण्यास अडचण येत होती. विशेष म्हणजे वेतन कमी असल्याने आशा स्वयंसेविका मोबाईल खरेदी करू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या १४ सप्टेंबरच्या बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गत १३ तालुक्यांतील सर्व आशा स्वयंसेविकांना अॅण्ड्रॉईड मोबाईल खरेदी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. माजी मंत्री सुनील केदार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, खनिज प्रतिष्ठानकडून १ कोटी ९० लाख ९८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून १९१० आशा स्वयंसेविकांना प्रतिमोबाईल ९,९९९ रुपयांप्रमाणे अॅण्ड्रॉईड मोबाईल खरेदी करून देण्यात येणार आहेत.

जेम्स पोर्टलवर खरेदीची प्रक्रिया – मोबाईल खरेदीची प्रक्रिया शासनाच्या जेम्स पोर्टलवरून करण्यात येणार आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व १९१० आशांकडे नवीन अॅण्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध होतील. त्यामुळे आशा स्वयंसेविका जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पुरविण्यात हातभार लावतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी व्यक्त केला.


Mumbai Mahangarpalika Asha Sevak Bharti 2024 for 5575 posts

The MCGM has decided to appoint as many as 5,575 Asha Sevika for the whole of Mumbai through the Department of Public Health on contract and remuneration basis. For this, Mumbai Municipal Corporation has invited applications from interested candidates. These Asha sevaks will get stipend upto 6,000 rupees per month on work based remuneration basis. The applications of the interested candidates for the post of Asha Sevika are to be submitted in the A’ to ‘T’ division offices of the Municipal Corporation. The application form will be available from the Medical Officer (Health) in the Divisional Office. 31 March 2023 is the last day for receipt of application. Executive Health Officer Dr. Mangala Gomare has appealed that the interested female candidates who are qualified for the work on the basis of remuneration should submit their applications.

मुंबईत पाच हजार 575 आशा सेविका नेमणार; कंत्राटी पद्धतीने होणार भरती

मुंबई महापालिका आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तब्बल ५ हजार ५७५ ‘आशा’ आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुरु केली आहे. यासंदर्भातील माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

Mumbai Asha Sevika Bharti 2024

  1. महापालिकेने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईसाठी तब्बल ५ हजार ५७५ आशा आरोग्य सेविकांची कंत्राटी व मोबदला तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मुंबई महापालिकेने अर्ज मागविले आहेत. या आशा सेविकांना दरमहा सहा हजार रूपयेपर्यंत कामावर आधारित मोबदला तत्त्वावर मानधन मिळणार आहे.
  2. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विषयक कामकाजांसाठी राष्ट्रीय निकषांप्रमाणे सेविकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत साधारण १ हजार ८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच नागरिकांमध्ये असलेले विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असणार आहे.

Eligibility for Asha Sevika Bharti 2024 in Mumbai

  1. आशा स्वयंसेविका महिलांची वयोमर्यादा २५ ते ४५ वर्ष या दरम्यान असावी.
  2. इच्छुक महिला उमेदवार साक्षर व किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण पूर्ण झालेले अपेक्षित आहे.
  3. त्यांच्याकडे नेतृत्व गुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे.
  4. आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱ्या अपेक्षित आहेत, जेणेकरुन त्यांना कामकाज सुलभतेने करता येईल.

How to Apply for Asha Sevika Mumbai 2024

  1. आशा सेविका पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज महापालिकेच्या ए’ ते ‘टी’ विभाग कार्यालयांमध्ये सादर करायचे आहेत.
  2. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.
  3. ३१ मार्च २०२३ हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे.
  4. या कामावर आधारित मोबदला तत्वावरील कामासाठी पात्रता धारणा करणाऱया इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी केले आहे.

Required Documents to apply for Asha Swayamsevika Bharti

  1. While applying for the post candidates need to attach resume,
  2. 10th, 12th and educational certificates,
  3. School leaving certificate,
  4. Caste certificate (for backward class candidates),
  5. Identity card (Aadhaar card, license)
  6. Passport size photograph along with the documents.

Asha Swayamsevika Eligibility Criteria

  1. Only female candidates can apply for Asha Swayamsevak post.
  2. Married women will be given job opportunities here.
  3. Also, female candidates applying for the post must be local residents of Municipality.
  4. Candidate’s age should be between 25 to 45 years.

Asha Swayamsevika Bharti 2024: Brihanmumbai Mahanagarpalika has issued the notification for the recruitment of “‘Asha’ Volunteer” Posts. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 31st March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

बृहन्मुंबई महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “‘आशा’ स्वयंसेविका” पदांच्या रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

आशा सेविकायांचे कामाचे स्वरूप
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, १००० ते १२०० लोकसंख्येसाठी एक ‘आशा’ स्वयंसेविका व अंदाजे २५० घरांकरिता नेमणूक करण्यात येईल. आशासेविका वस्तीपातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करतील. त्यांना नेमून दिलेल्या परिसरात सर्वेक्षण करुन विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजनाबाबत कार्य करतील.

Asha Swayamsevika Notification 2024

Here we give the complete details of Asha Swayamsevika Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Asha Swayamsevika Bharti 2024 Details

 Recruitment Name : 

Brihanmumbai Mahanagarpalika

 Number of Vacancies : 
 Name of Post :  ‘Asha’ Volunteer
 Job Location :  Mumbai, Maharashtra
 Pay-Scale Rs. 6000/-
 Application Mode :  Offline Application Form
 Age Criteria :  25 to 45 Year

Maharashtra Asha Swayamsevika Recruitment 2024 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. ‘Asha’ Volunteer

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For ‘Asha’ volunteer
10th Class Pass

How to Apply for Asha Swayamsevika Recruitment 2024

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टी विभाग कार्यालय) 

⏰ All Important Dates of Asha Swayamsevika Jobs 2024

⏰ Last date to apply :
31st March 2023

Important Link of E Asha Swayamsevika Recruitment 2024

Here we give the all essential link for further use. 

PDF  ADVERTISEMENT


Asha Sevika Bharti 2024 application form

Asha Sevika Bharti 2024- As per the latest updates regarding Asha Sevika Bharti 2023 is that Asha Sevak recruitment has been announced by Mumbai Municipality. 415 sevaks will be appointed in R South division of Kandivali West and the process has started. Sample and selection criteria have also been given for that. It was stated that the interested maid should be from the department and preferably living nearby, should have minimum educational qualification of 10th, should be between 25 to 45 years of age and should be married. It has been asked to submit to the office of Medical Health Officer, R South Division, Kandivali by March 24. The recruitment process of Asha Sevikas is also going on in other departments of the Municipal Corporation in Mumbai. Read More details are given below.

देशासह राज्यात फ्लू आणि करोनाची चिंता पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून आशा सेविकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज सादर करावयाचे असल्यास काही निकषही पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभागाकडून याची प्रक्रिया सुरू असून कांदिवली पश्चिम या आर दक्षिण विभागात ४१५ सेविकांच्या नियुक्ती केली जाणार आहे. या भागात लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

Asha Sevika Mumbai Bharti 2024

  • मुंबई पालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे काम महत्त्वाचे आहे. करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. संसर्गजन्य तसेच विविध स्वरूपाच्या आजाराचे निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण अशा उपक्रमांमध्ये आशा सेविकांची मदत घेतली जाते.
  • सध्या मुंबई पालिका क्षेत्रात १ हजार १५० आशा सेविका असून त्यांना मानधन दिले जाते. सध्याच्या आशा सेविकांची संख्या पाहता पालिकेच्या विविध विभागातील आरोग्यकेंद्रामध्ये एक हजार ते एक हजार २०० लोकसंख्येमागे एक आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार पाच हजार आशा सेविकांची नियुक्ती करण्याचे नियोजन होते आणि त्याला सुरुवात झाली आहे.
  • कांदिवली पश्चिमेच्या आर दक्षिण विभागात ४१५ सेविकांची नियुक्ती केली जाणार असून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी नमुना व निवडीचे निकषही देण्यात आले आहेत. इच्छुक सेविका विभागातील आणि शक्यतो जवळ राहणारी असावी, किमान शैक्षणिक अर्हता दहावी असावी, २५ ते ४५ वयोगट आणि विवाहित असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. २४ मार्चपर्यंत कांदिवलीच्या आर दक्षिण विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. मुंबईतील पालिकेच्या अन्य विभागतही आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

Asha Sevika Bharti 2024- As per the latest updates regarding Asha Sevika Bharti 2023 is that 266 posts of Asha Sevikas have been sanctioned for Sangli district. Presently 1959 Asha Sevikas are working in the district. Asha Sevika has been sanctioned 266 posts for the district. Asha Swayamsevika Scheme is being implemented under the National Health Mission. Read More details are given below.

Asha Swayamsevika Salary Details

The Current Salary of ASHA Swayamsevika is Rs.3500 and Current Salary of Group Promoter is Rs.4700. This will be increased by Rs. 1500/- आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन ३५०० आणि गटप्रवर्तकांच्या सध्याचे मानधन ४७०० रुपये आहे. यामध्ये १५०० रुपयांची वाढ केली जाणार.

सांगली १० प्रकल्प अंमलबजावणी आराखडा २०२२-२३ मध्ये आशा योजनेंतर्गत आशा सेविकांची सांगली जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. सध्या जिल्ह्यात १९५९ आशा सेविका कार्यरत आहेत. यामध्ये नवीन मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा नागरिकांना सहजतेने उपलब्ध होणार आहेत.

आशा सेविकांच्या २६६ अतिरिक्त पदांना मंजुरी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या विशेष प्रयत्नाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या पाठपुराव्याने आशा सेविकांची जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय साधण्याच्या दृष्टीने आशा सेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.


Asha Sevika Bharti 2024- As per the news, 74 percent of Asha worker posts are vacant in Pune city. 1 thousand 124 ASHA worker posts are sanctioned in Pune city. However, only 298 Asha workers are actually working. Due to this, 26 percent of working Asha workers are facing heavy workload. Therefore, it is being demanded that the vacant posts of Asha worker should be filled.

पुणे शहरात १ हजार १२४ आशा वर्करची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात २९८ आशा वर्करच काम करत आहेत. सुमारे ७४ टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे काम करणाऱ्या २६ टक्के आशा वर्करवर कामाचा मोठा ताण येत आहे. त्यामुळे आशा वर्करची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्य शासन आणि महापालिकेने घेतलेल्या आरोग्यविषयक विविध निर्णयांची व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम आशा वर्करच्या माध्यमातून केलेजाते. कोविडकाळात वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्याचे काम आशा वर्करनी केले. लसीकरणामध्येही आशा वर्करचे काम उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात १ हजार नागरिकांमागे एक याप्रमाणे आशा वर्करची पदे मंजूर झालेली आहेत. परंत. अनेक पदे रिक्त आहेत. त्यामळे रिक्त पदे भरण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, असे आशा गटप्रवर्तक उपाध्यक्ष नीलेश दातखिळे यांनी सांगितले…

तीन ते पंधरा हजारांपर्यंत मानधन

स्तनदा मातांची तपासणी, लहान मुलांच्या लसीकरणाच्या नोंदी ठेवणे, पूर्व प्रसूती झालेल्या व कमी वजनाच्या बालकांची माहिती ठेवणे, रुग्णालयातच प्रसूती होण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करणे, नवजात बालकांना होणाऱ्या आजारांची माहिती घेणे व त्यांची योग्य काळजी घेणे. कुष्ठरोग, क्षयरोगाचे रुग्ण शोधणे, गोळ्या, औषधांचे वाटप करणे आदी कामे आशा वर्कर करतात. त्यांना मानधन मासिक ३ हजारांपासून १५ हजारांपर्यंत मिळते. 


Asha Sevika Bharti 2024: As per the latest updates regarding the Asha Swayamsevika Bharti is that the recruitment process for this posts will be started soon. Mumbai Municipal Corporation has decided to appoint 5,500 Asha Sevika. The Municipal Corporation has decided to go beyond the norms of the Central Government and pay these Asha Sevaks Rs. 10,000 to 12,000. Read More details are given below.

महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्याचा भार हा प्रामुख्याने आशा सेविकांवर अवलंबून असतो. त्यांच्याच माध्यमातून राज्याचा आरोग्य विभाग गर्भवती व बालकांचे आरोग्य जपणूक, विविध साथींचा आढावा घेण्याचे काम तसेच वृद्धांचे आरोग्य, मानसिक आणि अन्य आजारांशी निगडित विविध विषय हाताळणे, मार्गदर्शन, माहिती गोळा करणे आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्याची कामे करत असते. आशांचे हे महत्त्व ओळखून मुंबई महापालिकेनेही प्रामुख्याने झोपडपट्टी विभागात ५,५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Asha Sevika Recruitment 2024

  • महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या निकषांच्या पलीकडे जाऊन या आशा सेविकांना १० ते १२ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राज्यामध्ये आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुमारे साठ हजार आशा सेविका काम करीत असून प्रामुख्याने राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या या आशा सेविकांना जवळपास ७२ प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात.
  • मुंबई महापालिच्या अखत्यारीतील आशा सेविकांच्या माध्यमातून झोपडपट्टी विभागात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मासिक सभांचे आयोजन, जन्म-मृत्यूची नोंदणी, पात्र जोडप्यांची यादी, लसीकरणासाठी पात्र बालकांची नोंद, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व व पश्चात आवश्यक असलेल्या तपासण्यांची नोंद ठेवणे आदी ३९ प्रकारची आरोग्यविषयक कामे प्राधान्याने करावी लागतात. त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात साधारणपणे आठ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न या आशा सेविकांना मिळत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
  • मुंबईतील गरीब वस्तींमधील वाढलेली लोकसंख्या, महिला व लहान मुलांची संख्या आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात या भागातील आरोग्यविषयक माहिती हाती असणे तसेच या वर्गाला आरोग्यविषयक सेवा योग्यप्रकारे पोहोचविण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षांने अधोरेखित झाल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

As per the latest updates regarding the Asha Swayamsevika Bharti is that the recruitment process for this posts will be started soon. Chief Minister Eknath Shinde has recently announced the decision to appoint 5500 Asha Sevaks to make the health system more efficient in the Mumbai metropolis in view of the spread of Corona and Measles. Read the more details below and keep follow us on what’s app for further updates.

साडेपाच हजार आशा सेविकांची नियुक्ती होणार; राज्य सरकारचा निर्णय

  1. आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या आशा सेविकांची मुंबईत साडेपाच हजार पदे भरण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
  2. हा निर्णय घेऊन शिंदे – फडणवीस सरकारने काम करणारे सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे, असेही चित्र वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
  3. कोरोना आणि गोवर प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात आरोग्य व्यवस्था आणखी कार्यक्षम करण्यासाठी ५ हजार ५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात नुकताच जाहीर केला आहे. मुंबई महानगरात गोवर प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने साडे पाच हजार आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्रीमती वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे .
  4. श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगराच्या वैद्यकीय व्यवस्थेत आशा सेविकांचे काम महत्वाचे आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. संसर्गजन्य तसेच विविध आजारांचे निदान करणे, लसीकरण कार्यक्रम, लहान मुले आणि गर्भवती मातांचे आरोग्य जपण्यासाठीचे उपक्रम यात आशा सेविकांचे काम महत्वाचे असते, हे ओळखून शिंदे फडणवीस सरकारने साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होणार आहे.
  5. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धोरण लकव्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय होत नव्हते. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हिताचे निर्णय वेगाने घेतले जात आहेत.

As suggested by MLA Ashish Shelar, 5000 “Sanitation Ambassadors” (Swachchta Dut) will be appointed. Similarly, 5500 Asha Sevika will also be recruited,” announced Chief Minister Shinde.

मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा..!

  1. मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. औषध दिरंगाईची चौकशी करण्यात येईल. तसेच, ५५०० आशा सेविकांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
  2. मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. यावर बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, “या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का?”, असे प्रश्न उपस्थित केलं होतं. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
  3. “आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ५००० स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ५५०० आशा सेविकांचीही भरती करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
  4. या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.

Asha Swayamsevika Bharti 2024- Latest updates regarding Asha Swayam  Sevika Bharti 2022 is that it has been decided to recruit 5000 Ashasevaks into the service to eliminate the errors at various levels of health survey found in the spread of measles. The recruitment of 5000 hopefuls will be done through the Mumbai Municipal Corporation.

गोवर प्रसारामध्ये आढळलेल्या आरोग्य सर्वेक्षणाच्या विविध पातळ्यांवरील त्रुटी दूर करण्यासाठी पाच हजार आशासेविकांना सेवेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशासेविकांचे काम महत्त्वाचे असून करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. संसर्गजन्यच नव्हे तर विविध स्वरूपाच्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण, लहान मुलांचे, गर्भवती मातांचे आरोग्य अशा उपक्रमांमध्ये आशासेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला असून पालिकेच्या अंतर्गत स्तरावरही ही प्रक्रिया सुरू आहे.

Asha Swayam Sevika Bharti 2024

  • गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण आरोग्यव्यवस्थेचा लेखाजोखा घेतला जात आहे.
  • उपनगरीय रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्था, रचना, आरोग्यकेंद्रांची उपलब्धता, तेथील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा दर्जा या आरोग्यसेवांशी निगडित विविध वैद्यकीय सेवांची गुणवत्ता तपासली जात आहे.
  • रिक्तपदांची पूर्तता करण्याचेही आव्हान आहे.
  • करोना संकटानंतर आरोग्य सुविधांसाठी गुणात्मक, संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची गरज वाढली आहे.
  • त्यात सर्वेक्षणाचा भाग महत्त्वाचा असून पालिका क्षेत्रामध्ये सध्या १,५५० आशासेविका आहेत.
  • त्यांच्या कामाचे निश्चित उद्दिष्ट साध्य केल्यानंतर त्यानुसार मानधन दिले जाते.
  • एक हजार लोकसंख्येमागे एक या प्रमाणानुसार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल.
  • मुंबईत या नियोजनानुसार पाच हजार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्यअधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मानधनही समाधानकारक हवे-Asha Sevika Bharti 2024

पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये गोवर संसर्गाच्या प्रसाराचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात असताना आशासेविकांच्या उपलब्धतेचाही मुद्दा पुढे आला. मानधनाच्या मुद्द्यांवरही आशासेविकांच्या नियुक्तीवेळी समाधानकारक पर्याय देण्याची पालिका प्रशासनाची तयारी असल्याचे समजते. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. काळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘प्रशिक्षणानंतरच जबाबदारी द्यावी’- Mumbai Asha Sevika Bharti 2024

  • अचानक आलेल्या आजारांच्या साथींसाठी अनेकदा जास्तीचे काम करावे लागते.
  • गोवर संसर्गामध्ये काम करूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि अधिकच्या कामामुळे नेहमीची मोबदला मिळणारी कामे मागे पडतात.
  • त्यामुळे त्यांच्या मानधनाची रक्कम कमी होते.
  • तरी सर्वेक्षण, साथरोग नियंत्रणासाठी महिन्याला किमान ३,००० रुपये अतिरिक्त मानधन मंजूर करावे.
  • दर महिन्याच्या सात तारखेच्या आत मासिक मानधन देतानाच ज्या ७८ कामांसाठी मोबदला मिळतो, त्यातील काही कामांचा तपशील भरून घेतला जात नाही.
  • भरती झाल्यावर ताबडतोब प्रशिक्षण दिल्यानंतरच कामांची जबाबदारी आणि मोबदला देण्यात यावा’, अशी मागणी आहे.
  • मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन यांनी मुंबईत काम करणाऱ्या आशासेविकांचे प्रलंबित प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधले.

आशा स्वयंसेविका भरती 2024 अँप्लिकेशन फ्रॉम 

Asha Swayamsevika Bharti 2024: Best job opportunity for 8th pass women, if you are 8th pass then this job is for you, under Pimpri Chinchwad Municipal Corporation Asha Swayamsevak posts are recruiting. There are total of 157 vacancies to be filled for Asha Workers in PCMC. Candidates age should not exceed 45 Year for Asha worker.  Interested and eligible applicants need to sending their application form to the address given Address. Candidates Read the complete details given below on this page regarding the Asha Swayamsevika Recruitment 2022/Asha Swayamsevika Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Total 157 vacancies are to be filled in Akurdi Hospital, Yamunanagar Hospital, Bhosari Hospital, YCS Hospital, Sangvi Hospital, Jijamata Hospital, Talera Hospital, Thergaon Hospital. Candidates from reserved category for this post will be given relaxation in recruitment and age limit as per government rules. Detailed details of this are given in the notification. Also candidates need to follow the terms and conditions given by the concerned organization.

Asha Swayamsevika Recruitment 2024 Details

तुमच्या ओळखीत कोणी आठवी उत्तीर्ण महिला नोकरीच्या शोधात असेल तर तुम्ही त्यांची मदत करु शकता. कारण आठवी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत आशा स्वयंसेविका पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या पदासाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करु शकतात. विवाहित महिलांना येथे कामाची संधी दिली जाणार आहे. तसेच पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवार या पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थानिक रहिवाशी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे.

Asha Sevika Maharashtra Bharti 2024

आशा स्वयंसेविका भरती 2023

  • आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, भोसरी रुग्णालय, वाय.सी.एस रुग्णालय, सांगवी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, तालेरा रुग्णालय, थेरगाव रुग्णालय येथे एकूण १५७ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  • पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

How to Apply For Aasha Worker Bharti 2024

  1. Candidates are given last date to apply according to their zone.
  2. 13, 14, 15, 16, 17, 20, 21 and 23 September are the last date to apply.
  3. Candidates have to send the applications to the respective zone address given in the notification.
  4. Candidates should read the notification carefully before applying.
  5. Candidates should note that if there are any errors in the application or if it is received after the given deadline, the application will be rejected.

आशा स्वयंसेवक भरती 2024 अर्ज कसा करायच?

  • उमेदवारांना त्यांच्या झोननुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. १३,१४,१५,१६,१७, २०, २१ आणि २३ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या संबंधित झोनच्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
  1. PCMC Vacancy 2022: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Asha Sevika Bharti 2023 application form

  2. Priyanka Gawade says

    Sindhudurg me chahiye B.A.completed

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!