भूमी अभिलेख विभागात ३१६ पदे प्रतीक्षायादीतून भरली जाणार – Bhumi Abhilekh Bharti 2024

Mahbhulek Surveyor Exam Date 2024

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2024 new update – The land records department had conducted the exam for 1,268 land surveyors last year. There were 142 posts reserved for ex-servicemen. However, the seats were lying vacant as candidates with architectural engineers were not available for the same. The state government has now approved filling up of these posts from the respective categories. Also, a total of 316 posts, including 174 remaining for various reasons, will be filled through the waiting list. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भूमी अभिलेख विभागात ३१६ पदे प्रतीक्षायादीतून भरली जाणार

 • भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यात १४२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव होती. मात्र, यासाठी स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत्या. आता ही पदे संबंधित प्रवर्गातून भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच वेगवेगळ्या कारणांनी राहिलेली १७४ पदे असे एकूण ३१६ पदे प्रतीक्षायादीतून भरली जाणार आहेत.
 • भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी स्थापत्य अभियंता असलेले उमेदवार पात्र असतात. या परीक्षेनंतर १ हजार १२६ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, माजी सैनिकांसाठी असलेल्या राखीव जागांवर उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळे १४२ जागा रिक्त राहिल्या होत्या.
 • भूकरमापक परीक्षेची निवड यादी २८ एप्रिल २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. राज्य सरकारच्या नियमानुसार कोणतीही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरले जाते. ही निवड यादी २७ एप्रिल २०२४ ला बाद ठरणार होती.

संबंधित जातीच्या प्रवर्गातून भरणार पदे

■ राज्य सरकारने प्रथम या निवड यादीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त जागा संबंधित जातीच्या प्रवर्गातून भराव्यात, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाला नुकतेच दिले आहेत. त्यानुसार आता या १४२ रिक्त जागा या प्रतीक्षा यादीतून भरल्या जाणार आहेत.
■ ज्या उमेदवारांना निवड यादीतून नियुक्ती देण्यात आली अशा उमेदवारांची संख्या ९५२ असून रुजू न होणारे तसेच रुजू झाल्यानंतर अन्य ठिकाणी नियुक्ती मिळाल्याने राजीनामा दिलेल्यांची संख्या देखील १७४ इतकी आहे. त्यामुळे माजी सैनिकांच्या प्रवर्गातील १४२ तर रुजू न झालेल्या व राजीनामा दिलेल्या १७४ जागा अशा एकूण ३१६ जागांवर आता या प्रतीक्षा यादीतून निवड केली जाणार आहे. येत्या पंधरवड्यात जागा भरल्या जातील, असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.


The way has been cleared for the recruitment of Talathi Post about 4,500 posts held by the Land Records Department. A complaint was made to the Disability Welfare Commissioner that the examination will be conducted without reservation for these posts. However, the District Collector has informed that this reservation has come from the provincial level, and the Disabled Welfare Commissioner has given the green light in this regard. Therefore, this exam will be conducted smoothly now, said Anand Raite, Additional Commissioner of Jamabandi Department of the Maharashtra state. Candidates keep visit on this page for the further updates.  Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!

तलाठी पदाच्या परीक्षेचा मार्ग मोकळा आरक्षणाबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून हिरवा कंदील

भूमी अभिलेख विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सुमारे साडेचार हजार पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांसाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र, हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता सुरळीत पार पडेल, अशी माहिती राज्याचे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

तलाठी भरती ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरु – Talathi Bharti 2023


The Land Records Department has announced the supplementary list of candidates who have qualified for the recruitment examination on 20/11/2022 by 3.00 PM after completing the scrutiny of the documents submitted by the candidates through the prescribed e-mail. Eligible applicants can download admit card before 26 November 2022.

Bhumi Abhilekh Admit Card भूमी अभिलेख विभाग भरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गाकरीता सुरू असणाऱ्या पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक १८/११/२०२२ व १९/११/२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार दिनांक १८/११/२०२२ रोजी प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दि. २०/११/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत विहीत ई-मेलद्वारे उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी पुर्ण करुन पदभरती परीक्षेकामी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुरवणी यादी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पात्र उमेदवारांच्या पुरवणी यादीतील उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचे काम IBPS कंपनीमार्फत प्रथम प्राधान्याने सुरू आहे. सदर उमेदवारांना उशिरात उशिरा दिनांक २६/११/२०२२ रोजी दु. १२.०० वाजेपुर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

यादी डाऊनलोड करा 


भूकरमापक पदांचा भरती परीक्षेची तारीख जाहीर :  Bhukarmapak means Surveyor Post recruitment process was completed last year and the examination will expected in this month last week. Candidates who are waiting the this examine they can ready for the examination. Surveyor Recruitment Examine will be dated on 28th 29th and 30th November 2022. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर च्या 28, 29 & 30 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे. 

Bhumi Abhilekh Bharti 2022

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

Bhumi Abhilekh Vibhag Exam 2022 – Exam Centers

Bhumi Abhilekh Bharti 2022

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक देखील दिनांक १४/११/२०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Mahbhulek Surveyor Exam Date 2022

bhumi abhilekh exam date

Bhumi Abhilekh Exam Schedule &  Exam Center 

Maharashtra Bhumi Abhilekh has recently released the Ineligible List. Applicants who applied for these posts may check their list from the given link.

Bhumi अपात्र उमेदवारांची यादी


Latest updates regarding Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag  Bharti 2022 is that The way for the recruitment of 1020 posts stalled for the last one year in the land record department has been cleared. This examination will be conducted by IBPS and the planning of the examination in the first week of December has been done by the Land Records Department. Read More details are given below.

भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सर्वेअर) पदासाठीच्या १०२० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आयबीपीएस’कडून ही परीक्षा घेण्यात येणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षांपासून रखडलेली ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.  भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागू शकणार आहेत.

Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022

भूमी अभिलेख विभागाने भूकरमापक-लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये सुरू केली. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १०२० पदांसाठी राज्यभरातून तब्बल ७६ हजार ३७९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६ हजार अर्ज वैध ठरले असून या उमेदवारांना पदभरतीची प्रतीक्षा होती. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा भरण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘सप्टेंबर महिन्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये विभागाची रखडलेली पदभरती आयबीपीएसकडून घेण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला असून मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस परीक्षा घेणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा होऊ शकेल.’

 पदभरती का रखडली?

उमेदवारांच्या अर्जामधील त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाच राज्यातील पोलिस भरती, आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच म्हाडा या अनेक विभागांतील परीक्षा घेण्यापूर्वीच पेपर फुटले. या परीक्षा घेणाऱ्या एका खासगी कंपनीकडे भूमी अभिलेख पदभरतीचे काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीचे व्यवहार पोलिसांनी ठप्प केल्याने भूमी अभिलेख पदभरतीसाठीचा सर्व विदा अनेक महिने संबंधित कंपनीकडून विभागाला मिळूच शकला नाही. त्यानंतर पोलीस, न्यायालय अशा विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला आणि पदभरतीबाबतचा सर्व विदा प्राप्त करण्यात आला. या प्रक्रियेतही बराच वेळ खर्ची पडला.

Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: Latest updates regarding Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag  Bharti 2022 is that The recruitment process of 1250 employees of Surveyor is stalled. Recruitment of 1250 employees of surveyor will be done soon. 33 percent posts are vacant in Land Records Department. There are 1500 vacancies for the post of surveyor. Read More details regarding Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022 are given below.

एकीकडे पाय बांधायचे आणि दुसरीकडे पळण्याचे आदेश द्यायचे’ अशी काहीशी अवस्था भूमी अभिलेख विभागाची झाली आहे. या विभागातील सर्व्हेअर (भूकरमापक) या पदासाठी एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्ष होत आले. अद्यापही त्यास राज्य सरकारकडून मान्यता न मिळाल्याने भरती होऊ शकलेली नाही. या रिक्त पदांमुळे राज्यात एक लाखाहून अधिक मोजणी अर्ज प्रकल्प प्रलंबित पडले आहेत. असे असताना डिसेंबरपर्यंत ही सर्व प्रकरणे मार्गी लावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2022

राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एकट्या पुणे |जिल्ह्यात सध्या चार हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे काम सुरू आहेत. त्यापैकी काही प्रकल्प मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत, तर काही प्रकल्प हे सर्वेक्षणाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे मोजणीच्या अर्जाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र भूमि अभिलेख विभागात ३३ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सर्व्हेअर या पदाच्या दीड हजार जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम दाखल होणाऱ्या मोजणी अर्जावर होत असून प्रलंबितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


भूमी अभिलेख विभागात विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, कर्मचायांच्या तुटवड्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वेअरची १२५०  कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया थांबली आहे. तातडीने ही भरती केली पाहिजे, असे विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी सांगितले.

भूमी अभिलेख विभागाची अर्हता परीक्षा पास झालेल्या या विभागातील ७६ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. परीरक्षक भूमापक आणि निमतानदार यांना शिरस्तेदार व मुख्यालय सहायक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

विभाग – पदोन्नत कर्मचारी

 • अमरावती -१५
 • नाशिक -१६
 • पुणे -१८
 • औरंगाबाद -९
 • मुंबई -१८

खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊनही कर्मचाऱ्यांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नती मिळाली नव्हती. प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आलेल्या संवर्गावर जाण्यासाठी त्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी ५ ऑगस्टला एकाचवेळी राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. पदसमूह तीनमध्ये तीन वर्षे सेवा व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निमतदार व परिरक्षक भूमापक यांना पदोन्नती मिळाली. ते आता पदसमूह दोनमध्ये समाविष्ट झाले आहे. या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढे गट ‘ब’ राजपत्रित अधिकारी वर्गदोनमध्ये पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे.

मुख्यालय सहायक व शिरस्तेदार ही पदे भरल्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. सध्या या विभागात गावठाण मोजणीची कामे सुरू आहेत. यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शिवाय, ड्रोन सर्व्ह, ई-मोजणी, आदी प्रकल्प या विभागामार्फत राबविली जात आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2022 updates in Yavatmal District : Due to lack of Man power lots of work has been pending in department of Land Record (Bhumi Abhilekh Vibhag). Near about 107800 counts (Mojanya) of agriculture, plots, houses in six divisions of Yavatmal are stalled due to lack of staff, lack of materials etc.  There are total 4,500 posts of surveyors have been sanctioned in the Bhumi Abhilekh department. In fact, work is being done on 2,500 people. 1,500 seats have been vacant for a long time. More than 500 surveyors have been promoted recently. Staff shortages have affected the counting process. Generally, counting is accelerated from November. Read the more details given below and keep visit us for the further updates.

भूमी अभिलेख विभागात १२०० पदे रिक्त

 • कर्मचाऱ्यांची वानवा, साहित्याचा तुटवडा आदी कारणांमुळे यवतमाळ येथील सहा विभागांमध्ये शेती, प्लॉट, घराच्या एक लाख सात हजार ८०० मोजण्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात करावयाच्या अतितातडीच्या मोजण्याही लांबणीवर पडत आहेत. सर्वाधिक मोजण्या पुणे विभागात प्रलंबित असून सर्वात कमी औरंगाबाद विभागात आहेत.
 • भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत. अलीकडे ५००हून धिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते.
 • १,२०० पदांची भरती थांबली  – भूमी अभिलेख विभागात १,२०० विविध पदे भरण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आली. यावर अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. वर्ग तीनमधील पदसमूह चारचा या पदभरतीत समावेश होता. या जागा भरल्या नसल्याने विभागापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती -छाननी अर्ज प्रक्रिया सुरु

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली. परंतु ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.

तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.

छाननी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या  https://landrecordsrecruitmen2021.in व  https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

त्यानुसारदिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

छाननी अर्ज हे केवळ दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख(Mahabhulekh) पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Maharashtra is leading in Svamitva Yojana. The scheme operates under the Department of Land Records (Bhumi Abhilekh). The scheme aims to promote socio-economic empowerment and self-reliant rural India. The government claims that the scheme will boost village development and trust. Under this scheme, drone survey was conducted in 1 lakh villages. There are many vacancies in the Land Records Department of the State of Maharashtra. Therefore, the government is demanding attention to this department and filling the vacancies immediately.

पीएम स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड अप्लीकेशन फॉर्म

स्वामित्व योजनेत महाराष्ट्र अग्रेसर आहे. हि योजना भूमी अभिलेख विभागात अंतर्गत काम करते. या योजनेचा हेतू सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताला प्रोत्साहन देणे आहे. सरकारचा दावा आहे या योजनेतून गावाचा विकास आणि विश्वासाला प्रोत्साहन मिळेल. या योजने अंतर्गत १ लाख गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागात अनेक पदे रिक्त आहेत, या परिस्थितीत सर्वेक्षणाचे काम उत्तम रित्या पार पडणार आले. त्यामुळे शासनाने या विभागाकडे लक्ष दावे आणि रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी केली जात आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Online Apply

How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022

Mhada invited online application form from eligible candidates from official website i.e. https://landrecordsrecruitment2021.in.

Candidates follow the below given steps and complete their online registration process:

 1. First click on the below given online apply link on this page.
 2. Fill the registration form with given information.
 3. Click on the Submit Button
 4. Pay the prescribed examination fee by filling all the details in the online application form.
 5. The list of candidates for the examination will be displayed on the website.
 6. Helpline Telephone number if candidates have difficulty in filling online application contact to – 7057070842, 7057080572 Monday to Saturday from 9.00 am to 6.00 pm, also [email protected] e-mail id 

Mahabhulekh 7-12 Download

महाराष्ट्रातील सर्व जिल्हांचा सात बारा कसा डाउनलोड करायचा ? – येथे पहा

Maharashtra 7/12 Download


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
 1. Rakesh sanjeev Natekar says

  Rakesh Sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टी या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T, वाहक लायसन्स परवाना जात मनेवार S, T, 9960328372

 2. Admin says

  latest updates is here

 3. Rajendra Aurase says

  My government jobs my carrier

 4. Priya Pimprikar says

  Bhumi abhilekha vibhag barti 2021

 5. Viraj says

  Government job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!