नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक पात्रता परीक्षेत बदल

Changes In Teacher Eligibility Tests

Changes In Teacher Eligibility Tests: Some changes will be made in the Teacher Eligibility Test (TET) in the context of the new education policy. The National Policy Education Council (NCTE) has appointed a committee to look into the changes in the TET as the new policy requires teachers from pre-primary to 12th standard to pass the TET.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक पात्रता परीक्षेत बदल

नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) काही बदल करण्यात येणार आहेत. नव्या धोरणात पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांचे टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आल्याने टीईटीमधील बदलांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) समिती नियुक्त केली असून, देशभरातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई)  शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत मागवली आहे.

आतापर्यंत पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य होती. मात्र नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षक व शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एनसीटीईने शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी समिती नियुक्त E0े ली आहे. ही A4मिती पूर्वप्राथमिक ते बारावीपर्E0ंतच्या टीईटीची रचना, परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना ३१ मार्चपूर्वी सादर करणार आहे, असे एनसीटीईने स्पष्ट के ले आहे.

राज्य शासन, काही संस्था, व्यक्तींकडून टीईटीबाबत काही प्रश्न, अडचणी उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे संबंधित समितीला टीईटी संदर्भातील एनसीईटीच्या मार्गदर्शक सूचना, परीक्षांचे संख्यात्मक विश्लेषण, आतापर्यंत आलेल्या समस्या, अडचणींचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे एनसीटीईकडून राज्यांकडून, सीबीएसईने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षांसंदर्भातील माहिती मागवली आहे. टीईटीबाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!