CLAT 2023: CLAT 2023 परीक्षेची आन्सर की जारी; या लिंकवरून लगेच करा डाउनलोड

 CLAT Exam 2023- Answer Key

The Consortium of National Law Universities (NLUs) has released the CLAT 2023 answer key. The CLAT objection submission window for CLAT answer key has also opened. Candidates can download the CLAT 2023 answer key online from – consortiumofnlus.ac.in. Eligible candidates can raise objections, if any, on the official website consortiumofnlus.ac.in till December 20 upto 9.00 AM.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CLAT 2023 परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे, Consortium of National Law University, CNLU ने 18 डिसेंबर रोजी उशिरा CLAT परीक्षेची तात्पुरती आन्सर की जारी केली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही परीक्षेला बसला असाल तर, शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in ला भेट देऊन आन्सर की डाउनलोड करू शकणार आहात . ही आन्सर की नक्की कशी डाउनलोड करावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आन्सर की डाऊनलोड केल्यानंतर, त्यावर दिलेली उत्तरे काळजीपूर्वक तपासा आणि कोणत्याही उत्तरावर काही आक्षेप असल्यास, CNLU ने नोंदणी करण्याची संधी देखील दिली आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी, उमेदवारांना 20 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हरकत नोंदवावी लागेल.

आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न 1000/- रुपये शुल्क देखील भरावे लागेल याची नोंद घ्या. जे ऑनलाइन पद्धतीने सबमिट केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट, CLAT 2023 परीक्षा 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. यापूर्वी 8 ऑगस्ट ते 18 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

अशा पद्धतीनं डाउनलोड करा आन्सर की- How to Download CLAT Answer key 2023

 • विद्यार्थ्यांना आन्सर की डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in ला भेट द्यावी लागेल.
 • मुख्यपृष्ठावर, तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर आक्षेप आणि तात्पुरती आन्सर की या नावाखाली येणाऱ्या अधिसूचनेवर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या स्क्रीनवर PDF ओपन होईल. यामध्ये, परिशिष्ट 2 वर जा, जिथे तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की मिळेल.
 • CLAT परीक्षेसाठी तात्पुरती आन्सर की डाउनलोड करावी लागेल.
 • उमेदवार भविष्यातील वापरासाठी आन्सर की डाउनलोड करू शकतात.
 • आन्सर की डाउनलोड केल्यानंतर, उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सद्वारे त्यावर आक्षेप नोंदवू शकतात.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर CLAT फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल. अधिकृत वेळापत्रकानुसार, CLAT 2023 परीक्षेची अंतिम उत्तर की या आठवड्यात म्हणजेच 24 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. CLAT 2023 चा निकाल डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केला जाईल.

Here’s the official notification.

DOWNLOAD THE ASNSWER KEY 


CLAT Exam 2022- Results : The result of Common Law Admission Test (CLAT)  2022 has been announced. The CLAT exam was held on June 19. Applicants who applied for these posts may check their Results from the given link. Also Candidates check their results on consortiumofnlus.ac.in

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT) २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. १९ जून रोजी झालेल्या या प्रवेश परीक्षा निकालाची लिंक नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कन्सोर्टियमची अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवारांना नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे.

CLAT Result 2022: असा तपासा निकाल

 • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा.
 • एक नवीन लॉगिन पेज उघडेल.
 • तुमचा CLAT अर्ज क्रमांक/अ‍ॅडमिट कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख भरा आणि सबमिट करा.
 • CLAT 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
 • भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा

CLAT ची परीक्षा १९ जून रोजी देशभरातील ८१ शहरांमधील १३१ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण ६० हजार ८९५ नोंदणीकृत उमेदवारांपैकी ५६ हजार ४७२ उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षा आणि निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in ला भेट देऊ शकतात.

CLAT 2022 चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


The consortium of National Law Universities (NLUs) has issued notification for Common Law Admission Test (CLAT) 2022. The registration process for CLAT 2022 will start on January 1, 2022. Candidates can download the application online through the official website. The last date for submission of the application process is March 31, 2022.

CLAT 2022 ची परीक्षा ८ मे २०२२ रोजी होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पाच वर्षीय एलएलबी आणि एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते.

CLAT Registration 2022: नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज (NLUs)च्या कंसोर्टियमने कॉमन लॉ एडमिशन टेस्ट (CLAT) २०२२ साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. क्लॅट २०२२ परीक्षेसाठी रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया १ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात. अर्ज प्रक्रिया जमा करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च २०२२ आहे.

CLAT 2022 ची परीक्षा ८ मे २०२२ रोजी होणार आहे. परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. ही एक राष्ट्रीय स्तरावरील विधी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा आहे. २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पाच वर्षीय एलएलबी आणि एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. ही परीक्षा ऑफलाइन असेल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र तयार केले जातील.

परीक्षेसाठी पात्रता-Eligibility Criteria For CLAT Exam 2022

 • उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४० टक्के गुण) बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 • मार्च / एप्रिल २०२२ मधील परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • उमेदवारांकडे किमान ५० टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) एलएलबीची पदवी आवश्यक आहे.
 • पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात.

अर्ज शुल्क

 • CLAT 2022 साठी अर्ज भरताना उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट गेटवेचा उपयोग करायचा आहे.
 • याद्वारे अर्ज शुल्क जमा करता येईल. सर्वसाधारण गटातील उमेदवारांसीठी CLAT अर्जाचे शुल्क चार हजार रुपये आहे.
 • एससी, एसटी आणि बीपीएल उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,५०० रुपये आहे.

अधिकृत आणि अर्ज करण्यास येथे क्लिक करा 


There is news of work for candidates preparing for next year’s CLAT exams. The Consortium of National Law University (CNLU) has announced the dates for the Common Law Admission Test (CLAT) 2022. The dates for the 2022 CLAT exam were announced at a meeting of the CNLU Executive Committee and General Body held on November 14, 2021

१४ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीएनएलयूच्या कार्यकारी समिती आणि जनरल बॉडीच्या बैठकीत २०२२ मध्ये होणाऱ्या क्लॅट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर अपडेट पाहता येणार आहे.

हैदराबाद येथील नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथील प्राध्यापक फैजान मुस्तफा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, २०२२ मध्ये पहिल्यांदाच क्लॅट परीक्षा दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लॅट २०२२ चा पहिला टप्पा ८ मे रोजी आणि दुसरा टप्पा १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

क्लॅट २०२२ मध्ये झाले बदल

कार्यकारी समिती आणि महामंडळाच्या बैठकीत, क्लॅट २०२२ परीक्षेमध्ये इतर काही बदलांचा निर्णय घेण्यात आला. हा बदल उमेदवारांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

क्लॅट समुपदेशन शुल्क:

 बैठकीत क्लॅट २०२२ साठी समुपदेशन शुल्क कमी करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या सीएलएटी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांपैकी सर्वसाधारण श्रेणीसाठी समुपदेशन शुल्क ५० हजारांऐवजी ३० हजार असणार आहे. तसेच एससी, एसटी, ओबीसी, बीसी, इड्ब्ल्यूएस, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी समुपदेशन शुल्क केवळ २० हजार रुपये असणार आहे.

विद्यार्थ्यांची गोपनीयता:

उमेदवारांचे तपशील कोणत्याही विद्यापीठ किंवा कोणत्याही तिसऱ्या संस्थेला शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डिटेल्स शेअर करण्यासाठी उमेदवाराची संमती असेल तरच, त्याचे/तिचे तपशील परीक्षा मंडळाद्वारे संस्थेला दिले जातील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

क्लॅट कन्वेअर:

या बैठकीमध्ये हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूरचे कुलगुरु वी.सी.विवेकानंद यांची क्लॅट २०२२ परीक्षेसाठी संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Press Released dated 14-11-2021


CLAT 2021 second seat allotment list:

A consortium of National Law University on Monday announced the list of CLAT 2021 seats for the second counseling session. The list has been announced for UG and PG courses in 22 law universities across the country. Candidates who appeared for the CLAT exam can check their list on the official website consortiumofnlus.ac.in.

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कंसोर्टियमने CLAT 2021 सीट्सची यादी जाहीर केली आहे. देशभरामध्ये २२ लॉ युनिव्हर्सिटीमध्ये यूजी आणि पीजी कोर्ससाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जे उमेदवार CLAT परीक्षेसाठी उपस्थित होते ते अधिकृत वेबसाइटवर consortiumofnlus.ac.in वर आपली यादी तपासू शकतात. निर्धारित केलेला सीट नंबर स्वीकारणाऱ्या किंवा अपग्रेड करण्यासाठी किंवा CLAT प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ असणार आहे.  कंसोर्टियमने उमेदवारांना १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फीस भरण्याचे निर्देश दिले आहेत. CLAT लॉगिन खात्यामध्ये डॉक्यूमेंट अपलोड करण्यासाठी आणि पेमेंटची माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे.

अपग्रेडेशनचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांनी निर्धारित केलेल्या विद्यापीठाचे अपेक्षित शुल्क भरणे गरजेचे आहे. त्यानंतर कंसोर्टियमच्या वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करावे. ज्या उमेदवारांनी संबंधित शुल्क भरले असेल त्यांनाच वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करता येणार आहेत.

CLAT Exam Results

The National Law University Consortium has announced the results of the Common Law Entrance Test (CLAT). The result of CLAT 2021 will be announced on July 28. The CLAT exam was conducted offline on July 23. Candidates can view the results and counseling schedule on the official website consortiumofnlus.ac.in.

CLAT 2021: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कंसोर्टियमने कॉमन लॉ प्रवेश चाचणी (CLAT) च्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. CLAT २०२१ चा निकाल २८ जुलैला घोषित होणार आहे. CLAT परीक्षा २३ जुलैला ऑफलाइन माध्यमातून घेण्यात आली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर निकाल आणि काऊन्सिलिंगचे वेळापत्रक पाहु शकतात.

संस्थेने याआधी २३ जुलैला रात्री ९ वाजता CLAT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली होती. त्यानंतर उमेदवारांना २४ जुलै रात्री ९ पर्यंत आक्षेप नोंदविण्याचा वेळ दिला होता.

वेळापत्रकानुसार प्रत्येक श्रेणीत जागांच्या संख्येपेक्षा पाचपट अधिक संख्येत अर्ज मिळाल्यानंतर २९ जुलैला काऊन्सिलिंगसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होईल. काऊन्सिलिंग प्रक्रिया ३० जुलैला संपणार आहे. उमेदवारांना जागा मिळवण्यासाठी ५० हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

कंसोर्टियमने दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी पहिली ते चौथी अलॉटमेंट लिस्टमध्ये जागा निवडल्या आहेत आणि ज्यांना आपला प्रवेश मागे घ्यायचा आहे त्यांना १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


CLAT exam Answer Key

The answer sheet of Common Law Admission Test (CLAT 2021) has been announced. This answer sheet can be checked by undergraduate and postgraduate students by visiting the official website consortiumofnlus.ac.in.

CLAT 2021: कॉमन लॉ प्रवेश चाचणी (Common Law Admission Test, CLAT 2021)ची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. ही उत्तर तालिका अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाऊन तपासू शकतात. जे विद्यार्थी-विद्यार्थीनी या परीक्षेत सहभागी झाले होते ते अधिकृत वेबसाइटवर आपली उत्तर तालिका तपासू शकतात. तसेच उमेदवाराला कोणत्याही उत्तराबद्दल आक्षेप किंवा तक्रार नोंदवायची असेल तर ते २४ जुलै २०२१ रात्री ९ पर्यंत नोंदवू शकता.

कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (Consortium of National Law Universities)ने जाहीर केलेल्या क्लॅट परीक्षा उत्तर तालिकेबद्दल आक्षेप नोंदवताना १ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. जर त्यातील उत्तर चुकीचे सापडले तर उमेदवाराच्या खात्यात शुल्क परत दिले जाईल. परीक्षेसंदर्भाती अधिक माहितीसाठी विद्यार्थी-विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

अधिकृत वेबसाइट जाण्यासाठी इथे क्लिक करा


cLAT 2021 Common Law Admission Test Registration

CLAT Exam 2021: The deadline for online registration for the Common Law Admission Test (CLAT 2021) has been extended. Accordingly, candidates can now apply till May 15, 2021. Candidates who have not yet applied for the CLAT exam can apply online by visiting the official website https://consortiumofnlus.ac.in/

CLAT Exam: कॉमन लॉ एडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2021) परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची मुदत वाढवण्यात आली आहे. यानुसार आता उमेदवार १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत क्लॅट परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते अधिकृत संकेतस्थळ https://consortiumofnlus.ac.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिवर्सिटीज (CNLU) द्वारे CLAT 2021 परीक्षेची तारीख पुन्हा निश्चित करण्याबाबत कोणतेही अपडेट केलेले नाही.

क्लॅट परीक्षा देऊ इच्छिणआऱ्या उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अखेरच्या टप्प्यात अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर लोड वाढू शकतो, त्यामुळे अर्ज करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वेळ राखूनच अर्ज करावा. अधिकृत पोर्टलवरील अपडेटनुसार, क्लॅट परीक्षा १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या सत्रात आयोजित केली जाणार आहे.


कंसोर्टियम ऑफ नेशनल लॉ यूनिवर्सिटीजने क्लॅट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे…

CLAT 2020 Results: Result: कंसोर्टियम ऑफ नेशनल लॉ यूनिवर्सिटीजने क्लॅट 2020 (CLAT 2020 Result) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. क्लॅट परीक्षा ज्या उमेदवारांनी दिली आहे, ते आपला निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील.

देशभरात सुमारे ३०० परीक्षा केंद्रांवर २८ सप्टेंबर २०२० रोजी क्लॅट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. निकालापूर्वी कंसोर्टियम ऑफ नेशनल लॉ यूनिवर्सिटीजने अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे.

CLAT 2020 Result: क्लॅट 2020 निकाल कसा पाहाल?

– निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ consortiumofnlus.ac.in वर जा.
– यानंतर CLAT 2020 Result च्या लिंक वर क्लिक करा.
– आता विचारलेली सर्व माहिती भरा.
– यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल.
– तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
– भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊटही काढून ठेवू शकता.

काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी?

मंगळवार ६ ऑक्टोबरपासून काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. पहिली सीट अलॉटमेंट आणि क्लॅट कट ऑफ यादी ९ ऑक्टोबर रोजी जारी केली जाणार आहे. काऊन्सेलिंगत ३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक फेरीसाठी CLAT 2020 ची कट ऑफ यादी स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

याव्यतिरिक्त योग्य उमेदवारांना कॉल लेटर किंवा निमंत्रण पत्र मिळतील आणि त्यानंतर त्यांनी नोंदणी करायची आहे. काऊन्सेलिंग शुल्क भरायचे आहे.

CLAT Result 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


CLAT 2020 Examination : CLAT 2020 exam  : विधी अभ्यासक्रमांच्या सीईटीनंतरचे प्रवेशाचे वेळापत्रक कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने जाहीर केले आहे.

CLAT Result 2020: कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने क्लॅट २०२० परीक्षा होण्याआधीच एक पोस्ट-एक्झाम कॅलेंडर जारी केले आहे. क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे. कन्सोर्टियमच्या निर्णयानुसार, निकालाच्या प्रक्रियेला कोणताही विलंब न करता तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा झाली की तत्काळ त्याच दिवशी आन्सर की म्हणजेच गुणतालिका जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड – १९ महामारीमुळे ही परीक्षा आधीच खूप वेळा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या गाईडलाइन्सनुसार, महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

ही उत्तरतालिका प्राथमिक स्वरुपाची असणार आहे. विद्यार्थ्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी २९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. हरकत पुरावा आणि शुल्कासह पाठवायच्या आहेत. जर हरकतींचा स्वीकार झाला तर ते उत्तर अंतिम उत्तरतालिकेच समाविष्ट करण्यात येईल. वेळापत्रकानुसार अंतिम उत्तरतालिका ३ ऑक्टोबर रोजी अपलोड केली जाणार आहे.

अंतिम निकाल ५ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादीसह जाहीर केला जाणार आहे. काउन्सेलिंग गुणवत्ता यादीनुसार होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्यांचे पसंतीक्रम यानुसार प्रवेश दिले जातील. काउन्सेलिंग प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल. उमेदवारांना काऊन्सेलिंग फी म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतील. यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला जाईल. हे शुल्क त्यांच्या युनिव्हर्सिटी फीमध्ये अॅडजस्ट केले जाईल.


CLAT Exam 2020

The general meeting of the Consortium of National Law Universities was held on Monday. It reviewed the precautionary measures to be taken during the Covid-19 epidemic and set a date for the CLAT. The lockdown situation in various parts of the country was also reviewed. It was agreed that the examination should be conducted in compliance with all the necessary health and safety protocols.The Consortium of National Law Universities announced the date of the Common Law Admission Test (CLAT 2020) on Monday. The CLAT 2020 exam will be held on September 7, 2020.

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या सर्वसाधारण सभेत परीक्षेची तारीख ठरली…

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने सोमवारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT 2020) ची तारीख जाहीर केली. CLAT 2020 परीक्षा ७ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. त्यात कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेताना काय खबरदारीचे उपाय अवलंबता येतील त्यांचा आढावा घेण्यात आला आणि क्लॅटची तारीख ठरवण्यात आली. देशात विविध ठिकाणी असलेल्या लॉकडाऊन स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आरोग्य आणि सुरक्षिततेचे सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात येण्यावर एकमत झाले.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी क्लॅट परीक्षा ७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षा केंद्रांवर ती होईल.

कन्सोर्टियम परीक्षा केंद्रांची पाहणी करणार आहे. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा दिली जाईल. विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड हेच त्यांचे वाहतुकीचे परवाने समजले जावेत यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया कन्सोर्टियम पार पाडत आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. अॅडमिट कार्ड (हॉलतिकिट) विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांनंतर संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

राज्यातील सीईटी रद्द होणार नाही; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

कन्सोर्टियम परीक्षा केंद्रांची पाहणी करणार आहे. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा दिली जाईल. विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड हेच त्यांचे वाहतुकीचे परवाने समजले जावेत यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया कन्सोर्टियम पार पाडत आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. अॅडमिट कार्ड (हॉलतिकिट) विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांनंतर संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.


CLAT Exam 2020: The Common Law Admission Test (CLAT 2020) has once again been postponed. The Consortium of National Law University, Bangalore has immediately postponed the examination to be held on August 22, 2020. Earlier, the exam was scheduled to be held on May 10. Even then, the exam was postponed. Kovid – 19 Epidemic Infection situation is not normal, the examination has to be postponed. The organizing body has clarified in the notification when the new schedule of the examination will be announced.

CLAT 2020: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट पुन्हा लांबणीवर!

CLAT 2020 Examination : कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २२ ऑगस्ट रोजी नियोजित होती…

CLAT 2020 Examination: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे. यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड – १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा कधी केली जाणार हे आयोजक संस्थेने नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे.

कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

CLAT 2020 परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते.

यंदा कोविड – १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहेत. कोविड-१९ संसर्गाची स्थिती सामान्य होत नसल्याने ही परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते.

सोर्स: म. टा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!